Ladki Bahin Yojana: फेब्रुवारीचा हप्ताही लांबणीवर? लाडक्या बहिणींना कधी मिळणार १५०० रुपये? काय आहे नवी अपडेट

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला फेब्रुवारीच्या ₹१५०० च्या हप्त्याची वाट पाहत आहेत. दर महिन्याला पैसे येण्यास विलंब होत असल्यानं महिला वर्गात नाराजीचे वातावरण आहे.
Ladki Bahin Yojana:
Women beneficiaries await clarity as February installment of ₹1500 under Ladki Bahin Yojana faces delaySaam tv
Published On
Summary
  • लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी हप्ता अद्याप अनेकांना मिळालेला नाही.

  • काही लाभार्थींना जानेवारीचे पैसेही बाकी आहेत.

  • दर महिन्याला १५०० रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतूने राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. पण गेल्या काही महिन्यांपासून या योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास उशीर होतोय. आता मार्च महिना सुरू झालाय.

अनेक महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळालेला नाहीये. उशिराने पैसे मिळत असल्याने महिलांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. दरम्यान अनेक महिलांच्या बँक खात्यात अजून जानेवारीचै पैसे आले नाहीत. दुसरीकडे फेब्रुवारी महिना संपून मार्च महिना सुरू झालाय, त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार, असा प्रश्न आता महिला विचारू लागल्या आहेत.

Ladki Bahin Yojana:
Housing Society: हाऊसिंग सोसायटीतील मेंटेनन्सच्या पैशात घोटाळा झाला ? कुठे कराल तक्रार

राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेतून महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देते. २०२४ मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत जानेवारीपर्यंतचे हप्ते देण्यात आलेत. मात्र आता महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांच्या हप्त्यांची प्रतीक्षा आहे. यापूर्वी जानेवारीचा हप्ता देखील उशिराने मिळाला होता. त्यानंतर आता फेब्रुवारी महिना संपूनही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. दर महिन्याला हप्ता उशिरा मिळत असल्याने महिला वर्गात नाराजीचे वातावरण आहे.

Ladki Bahin Yojana:
EPFO Update: होळीला ३१ कोटी कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; PF खात्यावरील व्याजदर वाढणार की कमी होणार? आज होणार निर्णय

आज होळीचा सण असल्याने फेब्रुवारीचा हप्ता जमा होईल, अशी महिलांना अपेक्षा होती. मात्र त्यांची ही अपेक्षा फोल ठरली. यामुळे महिलांना आता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात जानेवारीचा हप्ता देण्यात आला होता. त्यामुळे फेब्रुवारीचा हप्ताही उशिराने मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील आठवड्याच्या अखेरीस पर्यंत पैसे येतील असा अंदाज आहे. दरम्यान याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com