Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹२१०० येणार? देवेंद्र फडणवीस आज मोठी घोषणा करण्याची शक्यता

Ladki Bahin Yojana 2100 Rupees Installment Announcement in Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे. लाडक्या बहिणींचा हप्ता २१०० रुपये करण्याबाबत सरकार घोषणा करु शकते.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam tv
Published On
Summary

आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची घोषणा होणार

२१०० रुपये मिळणार की नाही??

आज महाराष्ट्राचा आर्थिक वर्ष २०२६-२७ साठीचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget) सादर होणार आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाचे निर्णय होणार आहेत. दरम्यान, या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेबाबत काय निर्णय होतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये मिळणार का, असा प्रश्नदेखील उपस्थित केला जात आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: ५ दिवसात लाडकीच्या खात्यात ₹३००० जमा होणार? जानेवारी-फेब्रुवारीच्या हप्ताबाबत मोठी अपडेट

लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये मिळणार का? (Ladki Bahin Yojana 2100 Rupees Installment Announcement Today)

दोन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणूकीपूर्वी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. यावेळी महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर विधानसभेत महायुतीचे सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचा निधी वाढवून २१०० रुपये करण्याचा शब्द दिला होता. मात्र, आता दोन वर्ष उलटून गेले अजूनही याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पात लाडकीच्या २१०० रुपयांबाबत घोषणा होणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेच्या २१०० रुपयांबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता होती. मात्र, याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. त्यामुळे महिलांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. आता या अर्थसंकल्पात २१०० रुपयांबाबत घोषणा होणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यात जानेवारीचे ₹१५०० जमा; तुम्हाला आले की नाही? फक्त २ मिनिटांत करा चेक

लाडकीसाठी निधी होणार मंजूर

२०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. यामध्ये विविध योजनांसाठी निधी मंजूर केला जाईल. या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी आर्थिक वर्षासाठी निधी मंजूर केला जाईल. मागच्या वर्षी या योजनेसाठी ३६०० कोटींचा निधी मंजूर केला होता. यावर्षी योजनेसाठी किती निधी मंजूर होणार याबाबतही घोषणा होणार आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा फेब्रुवारीचा हप्ता रखडला, मार्चचे ₹१५०० कधी येणार? वाचा सविस्तर

राज्याची अर्थव्यवस्था देशातील सर्वात मजबूत आणि गतिशील अर्थव्यवस्थांपैकी एक असून चालू आर्थिक वर्षात ती ७.९ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२५-२६ या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्रातील संतुलित वाढ, पायाभूत सुविधांमधील मोठी गुंतवणूक आणि व्यवसाय सुलभतेसाठी केलेल्या सुधारणा यामुळे राज्याची आर्थिक स्पर्धात्मकता अधिक बळकट झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२५-२६ अहवाल विधानसभेत वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी तर विधानपरिषदेत राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सादर केला.

आर्थिक पाहणी अहवालानुसार २०२५-२६ मध्ये राज्याचे सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न ५१,००,५९७ कोटी रुपये इतके अपेक्षित आहे, तर वास्तविक स्थूल राज्य उत्पन्न २८,८२,६९९ कोटी रुपये इतके राहण्याचा अंदाज आहे. तसेच राज्याचे दरडोई उत्पन्न ३,४७,९०३ रुपये इतके अपेक्षित असून ते अखिल भारताच्या दरडोई उत्पन्नाच्या (२,१९,५७५ रुपये) तुलनेत लक्षणीय अधिक आहे.

Ladki Bahin Yojana
Maharashtra budget session : आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, मुख्यमंत्री 6 मार्चला मांडणार राज्याचा अर्थसंकल्प

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com