

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी
जानेवारीचे ₹१५०० जमा झाले
तुम्हाला आले की नाही? असं करा चेक
राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती. या योजनेत सध्या जवळपास पावणेदोन लाख महिला लाभार्थी आहेत. या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. महिलांच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे, याबाबत आदिती तटकरेंनी माहिती दिली आहे. दरम्यान, तुम्हाला पैसे आले की नाही हे तुम्ही चेक करु शकतात.
तुम्हाला पैसे आले की नाही?
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जानेवारीचा हप्ता होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, अनेक महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या महिलांनी केवायसी केले नाही त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. याचसोबत सर्व निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांना लाभ दिला जाणार आहे.
पैसे आले की नाही?अशा पद्धतीने करा चेक (Ladki Bahin Yojana 1500 Rupees Recieve or Not Check Online)
लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांना योजनेत पैसे आलेले नाहीत. तुम्हाला पैसे आलेत की नाही हे तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने चेक करु शकतात. तुम्हाला सर्वात आधी बँकेच्या अॅपवर जायचे आहे. तिथे तुम्हाला बॅलन्स चेक करायचा आहे. त्यावरुन तुम्हाला पैसे आले की नाही हे समजेल.
बँकेच्या अॅपवर जाऊन तुम्ही ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये जायचे आहे. त्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे क्रेडिट झाले की नाही हे समजणार आहे. ज्या महिला पात्र आहेत आणि केवायसी केले आहेत त्यांच्या अकाउंटला १५०० जमा झाले आहेत.
ऑफलाइन पद्धत
तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत हे तुम्ही ऑफलाइन पद्धतीने चेक करु शकतात. तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने बँकेत जायचे आहे. त्यानंतर तुम्हाला पासबुकवर एन्ट्री करुन घ्यायची आहे. यामध्ये पैसे आले की नाही हे समजणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.