Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! eKYC केल्यानंतरही पैसे मिळणार नाहीत, कारण काय?

Ladki Bahin Yojana eKYC Update: लाडकी बहीण योजनेबाबत एक अपडेट समोर आली आहे. या योजनेत केवायसी करताना चुका दुरुस्ती केल्यानंतरही तुम्हाला लगेच पैसे मिळणार नाहीत.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam tv
Published On
Summary

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट

केवायसी करण्याची शेवटची मुदत ३१ मार्चपर्यंत

केवायसी केल्यानंतरही हप्त्यासाठी वाट पाहावी लागणार

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत आता केवायसी करताना चुकी झाली असेल तर ती दुरुस्त करण्यासाठी संधी देण्यात आली आहे. आता महिला केवायसीतील चुक ३१ मार्चपर्यंत सुधारु शकतात. मात्र, केवायसी करुनही अनेक महिलांना पैसे मिळाले नाही. महिलांना पैसे मिळण्यास अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. यामुळे लाभार्थ्यांच्या मनात अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! फक्त याच लाडक्या बहि‍णींना eKYC करता येणार, पाहा नवा बदल

ईकेवायसीनंतरही हप्त्यासाठी वाट पाहावी लागणार (Ladki Bahin Yojana Installment Delay)

लाडकी बहीण योजनेत ईकेवायसी करताना चुका झालेल्यांसाठी पुन्हा ही प्रोसेस सुरु केली आहे. त्यामुळे अनेक महिलांना डिसेंबरपासूनचा हप्ता मिळालेला नाही. आता केवायसीत दुरुस्ती करुनदेखील महिलांना वाट पाहावी लागणार आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, ई-केवायसी करायची आहे. अर्जाची पडताळणी करुन शासन मान्यता मिळाल्यानंतरच हप्ते वितरित केले जातील. त्यामुळे महिलांना सध्या तरी पैसे मिळणार नाहीत. सध्याच्या स्थितीत ३१ मार्चनंतरच रखडलेले हप्ते दिले जाऊ शकतात. याबाबत सरकार मार्चनंतरच निर्णय घेईल,अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महिलांना रखडलेल्या हप्त्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी! ८६ लाख अर्ज बाद; ₹१५०० कायमचे बंद; तुमचंही नाव आहे का?

३१ मार्चनंतर खात्यात येणार पैसे

लाडकी बहीण योजनेत महिलांना जवळपास डिसेंबरपासूनचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे सर्व पैसे एकत्रितपणे दिले जातील. ३१ मार्चला ईकेवायसीची मुदत संपल्यानंतर महिलांना पैसे दिले जातील. ३ किंवा ४ महिन्याचे पैसे महिलांना मिळणार आहे. त्यामुळे महिलांना अजूब बरेच दिवस वाट पाहावी लागणार आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: फेब्रुवारी संपत आला तरी जानेवारीचा हप्ता नाही, ₹१५०० न येण्यामागचं कारण काय? वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com