Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी! ८६ लाख अर्ज बाद; ₹१५०० कायमचे बंद; तुमचंही नाव आहे का?

Ladki Bahin Yojana 86 Lakh Women Application Rejected: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेतून तब्बल ८६ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On
Summary

लाडक्या बहिणींसाठी टेन्शन वाढवणारी बातमी

८६ लाख महिलांचा लाभ बंद

आतापर्यंत लाखो लाभार्थ्यांना केले योजनेतून बाद

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेतून आता लाखो लाभार्थ्यांचा लाभ बंद करण्यात आला आहे. सुमारे ८६ लाख महिलांचा लाभ बंद झाला आहे. या महिलांना १५०० रुपये मिळणार नाही. त्यामुळे अनेक महिलांना फटका बसला आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: खुशखबर! लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट ₹६००० जमा होणार? रखडलेले ४ हप्ते एकत्र येणार

महाराष्ट्र सरकारने २०२४ मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती. या योजनेत कोट्यवधी महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. जेव्हापासून योजना सुरु झाली तेव्हापासून आतापर्यंत ८६ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील एकूण २.४ कोटी महिलांनी योजनेसाठी अर्ज केला होता. या योजनेत आता फक्त १.६ कोटी महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला आहे. जानेवारीच्या १४ तारखेला हा हप्ता देण्यात आला होता.

लाडकी बहीण योजनेत ५५ लाख महिलांचे अर्ज बाद केले आहेत. २.४ कोटींपैकी फक्त १.९ कोटी महिलांना ईकेवायसी केली आहे. यामधील १.६ कोटी महिलांचे केवायसी बरोबर असल्याचे समोर आले आहेत. दरम्यान, आता त्यातही ज्या महिलांच्या केवायसीत चुका झाल्या आहेत त्यांना दुरुस्तीसाठी ३१ मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.त्यानंतर महिलांना सर्व रखडलेले हप्ते एकत्र देण्यात येतील,असं सांगण्यात येत आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींची टेन्शन वाढवणारी बातमी! ₹१५०० बंद होण्याची शक्यता; कोणाला बसणार फटका?

लाडकीच्या हप्त्याचा मार्ग मोकळा

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या योजनेच्या हप्त्यासाठी समाज कल्याण विभागाकडून निधी वितरित करण्यात आला आहे. जवळपास ९८ कोटींचा निधी वितरिक करण्यात आला आहे. त्यानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या रखडलेल्या हप्त्याबाबत सरकारच्या हालचाली;₹१५००बाबत मोठी अपडेट समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com