Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या रखडलेल्या हप्त्याबाबत सरकारच्या हालचाली;₹१५००बाबत मोठी अपडेट समोर

Ladki Bahin Yojana January Installment Update: लाडकी बहीण योजनेच्या रखडलेल्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आता महिलांना लवकरच पैसे दिले जाणार आहे. यासाठी सामाजिक व न्याय विभागाचा निधी वितरित करण्यात आला आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On
Summary

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट

महिलांच्या खात्यात लवकरच येणार पैसे

सामाजिक व न्याय विभागाचा निधी वितरित

लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सर्वजण विचारत आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर गेला आहे. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. दरम्यान, आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. महिलांच्या खात्यात लवकरच पैसे जमा केले जातील. यासाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वितरित करण्यात आला आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: खुशखबर! लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट ₹६००० जमा होणार? रखडलेले ४ हप्ते एकत्र येणार

लाडकीच्या हप्त्यासाठी निधी वितरीत (Ladki Bahin Yojana Installment Update)

लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी आता निधी वितरित करण्याची प्रोसेस सुरु झाली आहे. लाजकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून जवळपास ९८ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे या निधीतून महिलांना आता हप्ता दिला जाणार आहे. येत्या काही दिवसात महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे.

आठवड्याभरात लाडकीच्या खात्यात येणार पैसे (Ladki Bahin Yojana January Installment Come on These Date)

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी निधी वितरीत करण्यात आला आहे. याची प्रोसेस सुरु झाली आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यात कधीही पैसे येऊ शकतात. निधी वितरित झाल्यानंतर तो अर्थ मंत्रालयाद्वारे लाडकी बहीण योजनेसाठी दिला जाईल. यामुळे या आठवड्याभरात महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींना मिळणार तब्बल ६ हजार रुपये? पण कसं समजून घ्या संपूर्ण गणित

महिलांना ₹१५०० की ₹३००० मिळणार?

लाडकी बहीण योजनेत महिला जानेवारी आणि फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्र दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आता यावेळी एकच हप्ता देणार की दोन्ही हप्ते एकत्रितपणे देणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: उरले शेवटचे १० दिवस! अजून जानेवारीचा हप्ता नाही; लाडक्या बहि‍णींना ₹३००० कधी मिळणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com