Ladki Bahin Yojana: आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींना मिळणार तब्बल ६ हजार रुपये? पण कसं समजून घ्या संपूर्ण घ्या गणित

Ladki Bahin Yojana Update: महाराष्ट्रातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना १५०० रुपयांऐवजी ६,००० रुपये मिळू शकतात.
Ladki Bahin Yojana Update:
Women beneficiaries await confirmation of the Rs 6,000 assistance under the Ladki Bahin Yojana in Maharashtra.canva
Published On
Summary
  • ई-केवायसीसारख्या तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष न करता वेळेत प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत गरजेचे

  • लाभार्थींनी ३१ मार्च २०२६ पूर्वी आवश्यक दुरुस्ती करावी.

  • या तारखेनंतर दुरुस्तीची कोणतीही संधी दिली जाणार नाही.

महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकार लाडक्या बहिणींना यावेळी १५०० रुपयांऐवजी ६००० रुपये येणार असल्याची शक्यता आहे. महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ही लाभार्थ्यांना ही ६ हजार रुपये मिळणार आहेत. लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र हा लाभ नियमित मिळण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे आता बंधनकारक करण्यात आलंय. ई-केवायसी पूर्ण केलेल्या लाभार्थींनाच पुढील हप्ते मिळतील.

Ladki Bahin Yojana Update:
बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले सोने चोरीला गेले तर? दागिने परत मिळतात का, बँक नुकसान भरपाई देते का?

ईकेवायसी करण्यासाठी सरकारन आधी ३१ डिसेंबर २०२५ ची मुदत दिली होती. परंतु त्या मुदतेपर्यंत अनेक महिलांचे केवायसी झाल्या नव्हत्या.तर काही महिलांना केवायसी करूनही पैसे मिळाले नव्हते. त्या घोळाचा तपास केला असता अनेकांना चुकीचे पर्याय निवडल्यामुळे ईकेवायसी करूनही त्यांना पैसे मिळाले नव्हते. त्यामुळे सरकारने आता नव्याने ईकेवायसी करण्यासाठी पोर्टल सुरू केले आहे.

Ladki Bahin Yojana Update:
भाजप सरकारने बंद केली लोकप्रिय लाडकी योजना; दुसरी योजनेतून देणार तब्बल १ लाख रुपये, जाणून घ्या नियम

अनेक महिलांच्या अर्जामध्ये तांत्रिक त्रुटी आढळल्या होत्या. काहींनी चुकीने “सरकारी नोकरी” किंवा “पेन्शनधारक” असे पर्याय निवडल्याने त्यांचा लाभ थांबला होता. डिसेंबर २०२५ पासून अनेक महिलांचे हप्ते रखडले असून त्यांना रक्कम मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर शासनाने ऑनलाइन दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून दिली. आधी अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणीची योजना होती; मात्र आता संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आलीय.

ज्या महिलांचे मागील काही महिन्यांचे हप्ते प्रलंबित आहेत, त्यांना ई-केवायसी यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर ते सर्व हप्ते एकत्र मिळू शकतात. समजा, चार महिन्यांचे हप्ते थकले असतील तर १५००रुपयांनुसार चार महिन्यांचे सुमारे ६,००० रुपये मिळतील. ही रक्कम थेट बँक खात्यात जमा होऊ शकते. त्यामुळे लाभार्थींनी ही संधी गमावू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या संदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची घोषणा केलीय.

ई-केवायसी दुरुस्तीची अंतिम मुदत ३१ मार्च २०२६ निश्चित करण्यात आलीय. मूळ मुदत डिसेंबर २०२५ पर्यंत होती मात्र लाभार्थींना अतिरिक्त संधी देण्यासाठी ती वाढवण्यात आलीय. या तारखेनंतर दुरुस्तीची कोणतीही संधी मिळणार नाहीये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर दरमहा मिळणारी ही मदत अनेक कुटुंबांसाठी मोठा आधार ठरतेय. त्यामुळे ई-केवायसीसारख्या तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष न करता वेळेत प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे लाभार्थींनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली माहिती तपासावी. आधार क्रमांक लिंक आहे का, बँक खाते तपशील योग्य आहेत का, हे जाणून घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com