Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी, डिसेंबर-जानेवारीचे ₹३००० खात्यात एकत्र येणार

Ladki Bahin Yojana December January ₹3000 installment update : लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात डिसेंबर व जानेवारीचे ३००० रुपये एकत्र जमा होणार आहेत. मकरसंक्रांतीला निधी वितरित होणार असल्याच्या घोषणेमुळे निवडणूक आचारसंहितेच्या भंगावरून विरोधकांनी सवाल उपस्थित केले आहेत.

पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मकरसंक्रांतीला 3 हजार रुपये जमा होणार होणार आहेत, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी पोस्ट करत दिलीये. परंतु सरकारकडून मकरसंक्रातींच्या दिवशी निधी वितरित करण्यात आला तर निवडणुकीच्या आचारसंहितेचा हा भंग नाही का असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जातोय. राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून, लाडकी बहिण योजनेच्या निधी वरूण विरोधक चांगलेच आक्रमक झालेय.

राज्यातील लाडक्या बहि‍णींना डिसेंबर आणि जानेवारी, या दोन महिन्यांचे ३००० रूपये एकत्र वितरित करण्यात येणार असल्याची माहिती भाजप नेत्यानी दिली आहे. नाव्हेंबर २०२५ चा हप्ता डिसेंबरच्या सुरूवातीला खात्यावर जमा झाला. आता डिसेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६ हप्त्याकडे सर्व लाडक्या बहि‍णींच्या नजरा खिळल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com