तुम्हीही ई-केवायसी अपडेट करताय? पोर्टलवरच्या या तांत्रिक चुकीमुळे ₹१५०० बंद होणार?

Ladki Bahin scheme last date update : माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू झाली असली तरी पोर्टल एरर, ओटीपी न येणे आणि साईट क्रॅश होण्यामुळे महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

How to complete Ladki Bahin scheme e-KYC online step by step Maharashtra मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी राज्य सरकारने ई-केवायसी (e-KYC) दुरुस्तीची प्रक्रिया पुन्हा सुरू केली. पण तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया डोकेदुखी ठरत आहे. पोर्टल संथ चालणे आणि हेल्पलाईनवरून प्रतिसाद न मिळणे यामुळे राज्यातील हजारो महिला संतापल्या आहेत.

काही त्रुटींमुळे ज्या महिलांचे अर्ज प्रलंबित होते किंवा ज्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही, त्यांच्यासाठी सरकारने ईकेवायसी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण पोर्टलवर लॉगिन करताना वारंवार 'एरर' येत आहे. ओटीपी (OTP) न येणे, प्रोफाईल अपडेट न होणे आणि साईट क्रॅश होणे अशा तक्रारींचा पाऊस पडत आहे. ग्रामीण भागातील महिलांना अधिक त्रास होत असल्याचे समोर आले. तांत्रिक मदतीसाठी देण्यात आलेल्या अधिकृत हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क केला जातोय, पम कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप महिलांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com