Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! फक्त याच लाडक्या बहि‍णींना eKYC करता येणार, पाहा नवा बदल

Who can do eKYC in Ladki Bahin Yojana update : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत eKYC साठी मोठा बदल. फक्त eKYC मध्ये चूक झालेल्या लाभार्थ्यांनाच दुरुस्तीची संधी; रखडलेले हप्ते एकत्र जमा होण्याची शक्यता.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam tv
Published On

How to correct eKYC errors in Maharashtra women scheme : राज्यातील लाडक्या बहि‍णींसाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा eKYC प्रक्रिया सुरू केली आहे. पण ही सर्वांसाठी नाही. तर फक्त 'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजनेसाठी ज्या महिलांनी आधी अर्ज भरलेला आहे अन् त्यात चूक झालेली आहे. त्या महिलांना चूक दुरूस्त करण्याची संधी राज्या सरकारने दिली आहे. ज्या महिलांचं ई केवायसी राहिलेय, त्यांना आता ई केवायसी करता येणार नाही.

ज्या महिलांनी योजनेचा फॉर्म भरताना eKYC प्रक्रियेत चुकीचे पर्याय निवडले होते, अशा लाभार्थ्यांसाठी सरकारने पोर्टलवर दुरुस्तीची विशेष सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ज्या महिलांना ईकेवायसी करता आलेली नाही, त्यांना यापुढे १५०० रूपयांचा लाभ मिळणार नाही. ईकेवायसी करताना ज्या महिलांकडून चूक झाली आहे, त्या महिलांना दुरूस्तीची संधी राज्य सरकारने दिली आहे. त्याच महिलांनी पोर्टलवर जाऊन दुरूस्ती करावी, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.

Ladki Bahin Yojana
Eknath Shinde : हे भस्मासूर-बकासूर आहेत, यांच्यामुळे महाराष्ट्र १० वर्षे मागे गेला, नाईकांचा शिंदेंवर हल्लाबोल

पोर्टलवर काय बदल झाला आहे?

"ही eKYC ची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून eKYC करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते." असा मेसेज पोर्टलवर असल्याचे दिसतेय. त्यामुळेच फक्त दुरूस्तीच करता येणार आहे. लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आधार संलग्न बँक खाते आणि योग्य eKYC असणे अनिवार्य आहे. ज्या महिलांचे अर्ज त्रुटींमुळे प्रलंबित होते किंवा ज्यांचे eKYC चुकले होते, त्यांनी तातडीने पोर्टलवर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्जाची दुरूस्ती केल्यावरच रखडलेल्या हप्त्याची रक्कम खात्यात जमा होणार आहे.

Ladki Bahin scheme, eKYC update
Ladki Bahin scheme, eKYC updateLadki Bahin
Ladki Bahin Yojana
Maharashtra Infrastructure : मुंबई-नाशिकचा प्रवास मुंबई-पुण्यासारखा होणार, मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक, १० हजार कोटींचा मोठा निर्णय

एकाचवेळी खात्यात ६ हजार जमा होणार -

राज्यातील लाडक्या बहि‍णींच्या खात्यात एकाचवेळी सहा हजार रूपये जमा होण्याची शक्यता आहे. होय.. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च.. या चार महिन्यांचे हप्ते एकाचवेळी वितरीत होऊ शकतात, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्यात खात्यात जमा झाला होता. त्यानंतर एकाही हप्त्याची रक्कम खात्यात आलेली नाही. प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला लाडकी बहीण योजनेचा हप्ता खात्यात जमा होईल, असे सरकारकडून सांगण्यात आले होते. पण लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीमुळे डिसेंबर महिन्यापासूनचे हप्ते रखडले आहे.नवीन आर्थिक वर्षात रखडलेले हप्ते एकत्र जमा होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Ladki Bahin Yojana
Gold Rate : सोन्याचा भाव ₹२६०० ने वाढला, चांदीलाही चकाकी, वाचा सुवर्णनगरीतील गोल्डचे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com