Eknath Shinde latest news : "माझ्या नादाला लागलात, तर आयुष्यभर माजी खासदार करेन" अशा शब्दांत राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. ठाणे आणि नवी मुंबईच्या राजकारणात सध्या गणेश नाईक विरुद्ध शिंदे गट असा तीव्र संघर्ष पेटल्याचे पाहायला मिळत आहे. शिंदेंना 'भस्मासुर' आणि 'बकासुर' म्हणत गणेश नाईकांनी टीकेचा बाण सोडला. यांच्यामुळे महाराष्ट्र १० वर्षे मागे गेल्याचा गंभीर आरोपही यावेळी त्यांनी केला. नाईकांनी ठाणे जिल्ह्यातील शिंदेंचे अस्तित्व पुसून टाकण्याबाबतही वक्तव्य केलेय. सरकारी यंत्रणेचा गैरवापर आणि जमिनी हडपण्याचे प्रकार आता खपवून घेणार नाही, असे सांगत त्यांनी महायुतीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आणला आहे.
माझ्या नादाला लागला तर ठाणे जिल्ह्यातील त्यांचं अस्तित्व कायमचं संपून टाकेल, फक्त परवानगी मिळाली पाहिजे. एकनाथ शिंदे यांची ठाण्यात एकही महापालिका येऊ देणार नाही. एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना कायमचा माजी खासदार करायला लावेल, असा हल्लाबोल नाईकांनी केला.
आयुष्यभर माजी खासदार लावावं लागेल, असे इथला ठाण्याचा आगाऊ खासदार आहे, त्याला ओपन सांगितलं आहे, मी नाही लावणार, कल्याण ठाण्याची जनता लावेल, असे गणेश नाईक म्हणाले. हे भस्मासूर बकासूर आहेत, यांच्यामुळे महाराष्ट्र राज्य १० वर्षे मागे गेले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी पापा केली आहेत, ही पापे लक्षात आली तर यांच्या जागा जेलमध्ये असतील, असा इशारा नाईकांनी दिला.
अजून सुधारा, नवी मुंबईकरांच्या सुविधांसाठी भूखंड द्यास वन खात्याच जमिनी लाटण्याचा प्रकार केला. सर्व यंत्रणा चुकीच्या पद्धतीने वापरण्यात आल्या आहेत. जोपर्यंत वनमंत्री मी आहे तोपर्यंत कुणाच्या घशात जागा घालू देणार नाही, माझं काही वैर नाहीये असे म्हणत राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांच्यावर समाचार घेतला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.