विकास काटे, साम टीव्ही प्रतिनिधी
Maharashtra political news : भिवंडी महानगरपालिकेच्या महापौर निवडीचे बिगुल वाजण्यापूर्वीच शहरात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. भिवंडीचे माजी महापौर विलास पाटील यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. भिवंडी न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले आहे. मध्यरात्री पाटील यांना गुन्हा शाखेने बेड्या ठोकल्या. आज त्यांना न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले. २००५ मधील प्रकरणात पाटलांवर कारवाई झाली.
भिवंडी महापालिका निवडणुकीत 'किंगमेकर' ठरण्याची क्षमता असलेले कोणार्क विकास आघाडीचे प्रमुख आणि माजी महापौर विलास पाटील यांना ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने रात्री उशिरा अटक केली. या अटकेमुळे भिवंडीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भिवंडीमध्ये लवकरच महापौरपदाची निवडणूक होणार आहे, त्याआधीच राजकीय नेत्यावर मोठी कारवाई केल्यानं वातावरण तापलेय.
विलास पाटील यांच्यावर घरांच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केल्याचा गुन्हा २०२५ मध्ये दाखल झाला होता. याच प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. महापौरपदाची निवडणुकीत विलास पाटील यांची कोणार्क आघाडी शिवसेनेला (एकनाथ शिंदे गट) पाठिंबा देणार असल्याची जोरदार चर्चा होती. त्याआधीच त्यांना अटक करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच विलास पाटील आणि भाजप आमदार महेश चौगुले यांच्यात रस्त्यावर मोठा राडा झाला होता. त्यामुळे ही अटक करत भाजपने राजकीय खेळी केल्याची शहरात चर्चा सुरू आहे.
भिवंडी महापालिकेत कोणार्क विकास आघाडीचे ५ नगरसेवक आहेत. सत्ता स्थापनेसाठी लागणाऱ्या जादूई आकड्यासाठी या ५ नगरसेवकांचे समर्थन अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. पाटील यांच्या अटकेमुळे आता ही आघाडी कोणाच्या बाजूने उभी राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस आणि भाजपकडून भिवंडी महापालिकेवर सत्ता स्थापन करण्याचा दावा केला जाऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.