Maharashtra Crime : उरणमध्ये खळबळ! भाजप आमदाराच्या बंगल्यात कोयता घेऊन तरूण घुसला अन्...

BJP MLA Mahesh Baldi : रायगडमधील उरण येथे भाजप आमदार महेश बाल्दी यांच्या बंगल्यात मद्यधुंद तरुण कोयता घेऊन घुसल्याने खळबळ उडाली. पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.
BJP MLA Mahesh Baldi
BJP MLA Mahesh BaldiBJP MLA Mahesh Baldi
Published On

Mahesh Baldi bungalow incident details : रायगड जिल्ह्यातील उरणमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. उरण विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार महेश बाल्दी यांच्या बांगल्यात एका तरूणाने राडा घातलाय. दारूच्या नशेत तरूण हातात धारदार कोयता घेऊन बंगल्यात घुसरला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. उपस्थित असणाऱ्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना कळवले. सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. पोलिसांनी तात्काळ त्या तरूणाला ताब्यात घेतले असून चौकशी करण्यात येत आहे.

आमदाराच्या बंगल्यात कोयता घेऊन तरूणा घुसल्याच्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेमुळे आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने, कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वीच पोलिसांनी त्या तरुणाला बंगल्याच्या आवारातून ताब्यात घेतले. मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे. या घटनेमागचे नेमके कारण काय? सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार का? याचा सखोल तपास सध्या उरण पोलीस करत आहेत.

BJP MLA Mahesh Baldi
Accident : लग्नाहून परतताना मृत्यूने गाठले; भीषण अपघातात ५ मित्रांचा करुण अंत

नेमकी घटना काय?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आमदाराच्या बंगल्यात घुसलेला तरुण हा पूर्णपणे मद्यधुंद आणि नशेत होता. शुक्रवारी भरदिवसा हातात नग्‍न कोयता नाचवत त्याने थेट आमदारांच्या बंगल्याचे गेट ओलांडून आत प्रवेश केला. तरुणाच्या हातातील कोयता पाहून तिथे उपस्थित असलेले कर्मचारी आणि सुरक्षारक्षक काही काळ बिथरले. तो तरुण काहीतरी बडबडत हिंसक हालचाली करत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

BJP MLA Mahesh Baldi
Horoscope Today : व्हॅलेंटाईन डेला ५ राशींवर होणार पैशांचा वर्षाव; तुमच्या नशिबात काय आहे? जाणून घ्या एका क्लिकवर!

अन् मोठा अनर्थ टळला

तरूणाच्या हातात कोयता पाहिल्यानंतर बंगल्यात असणाऱ्यांनी तात्काळ उरण पोलिसांना याबाबतची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेत तरूणाला ताब्यात घेतले. त्यामुळे सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही.

पोलिसांनी अत्यंत शिताफीने त्या नशेखोर तरुणाला ताब्यात घेतले आणि त्याच्या हातातील कोयता जप्त केला. या प्रकाराचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. एका लोकप्रतिनिधीच्या निवासस्थानी अशा प्रकारे सशस्त्र व्यक्तीने शिरकाव केल्यामुळे उरणमधील सुरक्षा व्यवस्थेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

BJP MLA Mahesh Baldi
"दादा, आता विठ्ठलाशी आयुष्यभर भांडण राहील" अमोल मिटकरींचं दिवंगत अजित पवारांना पत्र

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com