Accident : लग्नाहून परतताना मृत्यूने गाठले; भीषण अपघातात ५ मित्रांचा करुण अंत

Five friends killed in Sonipat road accident after wedding : हरियाणातील सोनीपत येथे लग्नावरून परतणाऱ्या सात मित्रांच्या स्कॉर्पिओ कारचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. पोलिसांकडून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे.
five friends dead Haryana road accident
five friends dead Haryana road accident Saam TV Marathi News
Published On

five friends dead Haryana road accident : लग्नहून घराकडे परत येत असताना ५ मित्रांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय. हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील गोहाना येथे हा भयंकर अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे स्कॉर्पिओ कार झाडावर आदळली अन् एका क्षणात होत्याचं नव्हते झाले. हा अपघात इतका भीषण होता की ५ मित्रांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात २ जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात मृत झालेले तरूण रोहतक जिल्ह्यातील असल्याचे समजतेय. सर्व मित्र भावड गावातील लग्न आटोपून घराकडे परत येत होते. पण त्याचवेळी काळाने घाला घातला. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सोनीपत जिल्ह्यातील घाडवाल ते भावड रस्त्यावर स्कॉर्पिओ (HR 98 B 9988) चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे भरधाव वेगात असलेली कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकली. या कारमध्ये ७ मित्र प्रवास करत होते. त्यामधील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भयंकर होता की गाडीचा चक्काचूर झाला. अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ जखमींना रूग्णालयात दाखल केले. या अपघातात गोलू, अंकुश, दीपक, सतबीर आणि सागर यांचा मृत्यू झाला.

five friends dead Haryana road accident
MSRTC : एसटीचा सवलतीचा प्रवास बदलला; महिला, ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थ्यांना पैसे मोजावे लागणार, सरकारचा प्लान काय?

५ तरुणांचा मृत्यू

घाडवाल ते भावड येथे झालेल्या भीषण अपघातामधील ५ ही मृत मित्रांचे वय २५ ते २८ वर्ष असल्याचा अंदाज आहे. गोलू हा विवाहित होता. तर इतर ४ मृत हे अविवाहित होते. अपघातामध्ये २ जण जखमी झाले आहेत. त्यामधील एक गंभीर जखमी असून त्याच्यावर खानपूरमधील रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या अपघातमधील दुसरा जखमी झालेल्या मोहित याची प्रकृती स्थिर आहे.

five friends dead Haryana road accident
Ajit Pawar death : रोहित पवार यांचा खळबळजनक दावा, थेट प्रफुल्ल पटेलांचे नाव घेत गंभीर आरोप, वाचा नेमकं काय म्हणाले?

कुटुंबावर दुखाचा डोंगर -

५ तरूणांच्या अकाली मृत्यूची बातमी समजताच खिडवली, घुसकानी आणि आजूबाजूच्या गावांमध्ये शोककळा पसरली आहे. कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळलाय. दरम्यान, पोलिसांनी या अपघाताची नोंद केली असून तपास सुरू केला आहे. हा अपघात का झाला? याचा तपास पोलिसांकडून कऱण्यात येत आहे. रोहतकमधील गावातील ७ तरूण भावड येथे लग्नाला गेले होते. लग्नानंतर ते घराकडे येत असताना भीषण अपघात झाला. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले आहेत. त्यामधील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे पोलीस अधिकारी धरमवीर यांनी सांगितलेय.

five friends dead Haryana road accident
वंदे भारतचे तिकिट खूपच स्वस्त, रेल्वेमंत्र्यांनी मांडलं गणित; चीन, जपान अन् फ्रान्सचा दाखला देत म्हणाले...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com