Ajit Pawar death : रोहित पवार यांचा खळबळजनक दावा, थेट प्रफुल्ल पटेलांचे नाव घेत गंभीर आरोप, वाचा नेमकं काय म्हणाले?

Ajit Pawar death controversy : अजित पवार यांच्या निधनाबाबत रोहित पवार यांनी गंभीर आरोप करत घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या फोनमुळेच मंत्रालयातून उशीर झाला आणि विमानाने जाण्याचा निर्णय घ्यावा लागला, असा दावा करण्यात आला आहे.
rohit pawar on ajit pawar  death
rohit pawar Saam tv
Published On

Rohit Pawar demands investigation into Ajit Pawar plane incident : अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनावर रोहित पवार यांच्याकडून संशय व्यक्त करण्यात येत आहे. रोहित पवार यांनी विमान कंपनीला तर धारेवर धरलेच आहे. त्या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली होती. अजित पवार यांचा १०० टक्के घातपातच झाला असल्याचा त्यांनी म्हटले. आता रोहित पवार यांनी थेट प्रफुल्ल पटेल यांचे नाव घेतलेय. प्रफुल्ल पटेल यांच्यामुळेच अजित पवार यांना २७ तारखेला मंत्रालयातून निघण्यास उशीर झाला, अन्यथा दादा रस्ते मार्गाने पुण्याला जाणार होते, असे रोहित पवार म्हणाले. अजित दादा २७ तारखेला गाडीने पुण्याला गेले असते आणि दुसऱ्या दिवशी गाडीनेच बारामतीला गेले असते, तर ही दुर्दैवी घटना घडली नसती, असेही रोहित पवार म्हणाले.

२७ जानेवारी रोजी सायंकाळी अजितदादा बारामतीला रस्ते मार्गाने जाणार होते. पण मंत्रालयातील काही कामांमुळे त्यांना जास्त उशिर झाला. त्यामुळे अजित पवार यांनी २८ तारखेला विमानाने बारमातीला जाण्याचा निर्णय घेतला, असे रोहित पवार म्हणाले. १० तारखेच्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी पूर्व विदर्भातील नेत्यामुळे अजित पवारांना उशिर झाला. त्यामुळे त्यांनी रस्ते मार्गाने जाण्याऐवजी विमानाने जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पूर्व विदर्भातील तो नेता कोण? याची चर्चा सुरू झाली होती. रोहित पवार यांनी आता थेट प्रफुल्ल पटेल यांचं नाव घेतलेय. प्रफुल्ल पटेल यांच्यामुळेच अजितदादा यांना उशीर झाला असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांच्या या आरोपावर आता प्रफुल्ल पटेल काय उत्तर देणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान, रोहित पवार सोमवारी अथवा मंगळवारी पत्रकार परिषद घेणार आहेत.

rohit pawar on ajit pawar  death
Gold Rate Today : भारत बंद असतानाच सोनं झालं स्वस्त, प्रतितोळा इतकी किंमत, वाचा 24K, 22K, 18K गोल्डचे ताजे दर

अजितदादांचा विमानाने जाण्याचा प्लॅन आधीपासून असता तर बुकिंग २६ तारखेला किंवा २७ च्या दुपारीच झाले असते. मात्र, विमानाचे बुकिंग २७ तारखेला रात्री उशिरा (७:३० च्या सुमारास) झाले. याचा अर्थ काहीतरी अनपेक्षित घडल्यामुळे त्यांना उशीर झाला . २७ तारखेच्या बैठकीत एका मोठ्या नेत्याचा फोन आला आणि फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी सांगत होते. तसेच एका पॉलिटिकल कन्सल्टंटच्या (नरेश अरोरा) शेकडो कोटींच्या कॉन्ट्रॅक्टवरून वाद झाला होता. रोहित पवार यांनी या प्रकरणाची २७ आणि २८ तारखेच्या घटनाक्रमासह सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. पायलट गेल्या एक-दोन महिन्यात कोणाला आणि कुठे भेटले होते, याचीही चौकशी व्हावी असे त्यांनी म्हटले आहे.

rohit pawar on ajit pawar  death
Accident : ५ मित्र देवदर्शनाला निघाले, पण वाटेतच काळाचा घाला, परभणीत मध्यरात्री भयंकर अपघात

२७ तारखेला मंत्रालयातील अजितदादांच्या कार्यालयात अचानकपणे राईस मिलची फाईल आली. दादांना त्याबद्दल काहीच माहिती नव्हती. संध्याकाळी प्रफुल पटेल यांचा फोन आला की अशी अशी फाईल आहे. ती फाईल मंत्रालयातून मागवून त्यावर सही होईपर्यंत बराच वेळ गेला.या उशिरामुळेच दादांना जो प्रवास गाडीने करायचा होता, तो रद्द करून रात्री ७ वाजून १३ मिनिटांनी दुसऱ्या दिवसाचे विमानाचे बुकिंग करावे लागले. दादांच्या जवळचे कार्यकर्ते प्रमोद हिंदूराव यांनीही हीच माहिती दिली आहे की फाईलच्या कामामुळे दादांना उशीर झाला आणि त्यांना नाईलाजास्तव विमानाने जावे लागले.

rohit pawar on ajit pawar  death
धक्कादायक! मदतीसाठी आलेल्या तरुणीचा पोलिस चौकीतच सौदा, पुन्हा बुधवार पेठेत पाठवले, पुण्यातील धक्कादायक घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com