Accident : ५ मित्र देवदर्शनाला निघाले, पण वाटेतच काळाचा घाला, परभणीत मध्यरात्री भयंकर अपघात

Parbhani car accident : परभणीतील जिंतूर येथे अकोली पुलावर मध्यरात्री भीषण अपघातात ४ तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी आहे. उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या गंगाखेडमधील मित्रांवर काळाचा घाला. पोलिसांकडून पुढील तपास सुरू.
Accident
Accidentsaam tv
Published On

Parbhani Jintur Akoli bridge car accident latest news : ५ मित्र उज्जेनला देवदर्शनासाठी निघाले होते. पण मध्यरात्री काळाने घाला घातला. परभणीतील जिंतूरमध्ये कारचा भयंकर अपघात झाला. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कारमधील सर्वजण गंगाखेडमधील असून त्यांचे वय २१ ते ३० यादरम्यान आहेत. अपघातानंतर गंगाखेडवर शोककळा पसरली आहे.

बुधवारी गंगाखेडमधील ५ मित्र एर्टिगा कारने उज्जैनला देवदर्शनासाठी निघाले होते. मध्यरात्री सव्वाबारा वाजता कार जिंतूरमधील अकोली पुलावर आली. पुलाजवळ पोहोचल्यानंतर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि भरधाव वेगातील कार बाजूच्या कठड्यावर जोरात आदळली. या धडकेत कारचा चक्काचूर झाला. कारमधील ४ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी आहे.त्याच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Accident
Gold Rate Today : भारत बंद असतानाच सोनं झालं स्वस्त, प्रतितोळा इतकी किंमत, वाचा 24K, 22K, 18K गोल्डचे ताजे दर

अकोली पुलावर कारचा अपघात झाल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी जखमींना जिंतूरच्या रूग्णालयात तात्काळ दाखल केले, पण डॉक्टरांनी चौघांनाही मृत घोषित केले. एका तरूणावर उपचार सुरू आहेत.रोहन संजय राठोड (वय २७), कृष्णा गुट्टे (वय २८), बालाजी आश्रोबा आवटे (वय २१),बालाप्रसाद उत्तमराव घोरपडे (वय ३०) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. गोपाळ गणेश रोकडे (वय २५) हा तरुण गंभीर जखमी आहे.

Accident
Bharat Bandh : आज भारत बंद! ६०० जिल्ह्यांवर परिणाम; शाळा ते बँक, काय सुरू, काय बंद? वाचा A टू Z माहिती

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनीही तात्काळ घटानस्थळावर धाव घेतली. अपघातानंतर कार चालक फरार झाल्याचं पोलिसांच्या तात्काळ लक्षात आले. पोलिसांनी अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल केला. फरार चालकाचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. ऐन तारुण्यात या चार तरुणांचा मृत्यू झाल्याने गंगाखेड शहरात शोककळा पसरली आहे.

Accident
महाराष्ट्र हादरला! १५ वर्षाच्या मुलीवर ३ जणांचा सामूहिक बलात्कार, बारावीच्या पोरानं घरी बोलवलं अन्...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com