सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी
Pune Budhwar Peth forced prostitution case latest update : पुण्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मदतीसाठी पोलिसांकडे आलेल्या तरूणीचा पोलिस चौकीतच सौदा झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली. पोलिसांनी मदतीसाठी आलेल्या तरूणीला पुन्हा बुधवार पेठेत पाठवल्याची संतापजनक घटना पुण्यात घडली. फरासखाना पोलिस ठाण्यात हा प्रकार घडल्याने पुणे पोलिस दलाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मदतीसाठी बांगलादेशी तरूणी फरासखाना पोलिस ठाण्यात आली होती. पण तिचा तिथेच पुन्हा सौदा झाला. त्या बांगलादेशी तरुणीला पुन्हा जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या कुंटणखाना मालकिणीच्या ताब्यात दिल्याचा आरोप महिला पोलिस कर्मचाऱ्यावर झाला. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर पुणे पोलिसांकडून पावले उचल्यात आले असून आरोप असणाऱ्या संबंधित महिला पोलिस हवालदाराला निलंबित करण्यात आले आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सुमारे महिनाभरापूर्वी रात्रीच्या वेळी एक तरुणी फरासखाना पोलिस ठाण्यात आली होती. तिने कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिस हवालदाराला आपण बांगलादेशी नागरिक असून बुधवार पेठ परिसरात आपल्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती दिली. तसेच आपली सुटका करून मदत करण्याची विनंतीही तिने केली. पण मदत करण्याऐवजी संबंधित महिला पोलिस हवालदाराने त्या तरुणीला बुधवार पेठेतील शुक्रवार पेठ पोलिस चौकीत नेले. तेथे ती तरुणी ज्या कुंटणखान्यात काम करत होती त्या कुंटणखाना मालकिणीला बोलावण्यात आले. त्यानंतर महिला पोलिस कर्मचारी आणि कुंटणखाना मालकिणीमध्ये काही संशयास्पद बोलणी झाल्याचा आरोप आहे.
या चर्चेनंतर मदतीची अपेक्षा ठेवून पोलिसांकडे आलेल्या तरुणीला पुन्हा त्या कुंटणखाना मालकिणीच्या ताब्यात देण्यात आल्याचे समोर आले आहे.हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिस विभागात खळबळ उडाली. या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असता कर्तव्यात गंभीर हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर फरासखाना पोलिस ठाण्याच्या तपास पथकात नेमणुकीस असलेल्या महिला पोलिस हवालदाराचे निलंबित करण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.