Gold Rate : सोन्याचा भाव ₹२६०० ने वाढला, चांदीलाही चकाकी, वाचा सुवर्णनगरीतील गोल्डचे दर

Gold rate today in Jalgaon : जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या दरात ₹२६०० ची वाढ तर चांदीत ₹५,००० ची उसळी. सततच्या चढउतारामुळे गुंतवणूकदार आणि खरेदीदार सतर्क. आजचे ताजे दर वाचा.
Today's Gold - Silver Price
Today's Gold - Silver PriceSaam TV
Published On

संजय महाजन, जळगाव प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Gold price increase ₹2600 latest Jalgaon rates : जळगाव सुवर्ण बाजारात सोने-चांदीच्या भावात सातत्याने सुरू असलेला चढउतार शनिवारीही (ता. १४) कायम होता. शुक्रवारी (ता. १३) चांदीच्या भावात १५ हजारांची (प्रतिकिलो) घट, तर सोन्याच्या भावात तीन हजार (प्रतिदहा ग्रॅम) रुपयांची घसरण झाली होती. शनिवारी सोन्यात दोन हजार ६०० ची (प्रतिदहा ग्रॅम) वाढ, तर चांदीत पाच हजारांची (प्रतिकिलो) वाढ झाली.

दोन महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या भावात सातत्याने चढउतार होत आहेत. यामुळे गुंतवणूकदार व शुभमंगलप्रसंगी सोने, चांदी खरेदी करणाऱ्यांना सतर्क राहावे लागत आहे. शुक्रवारी चांदी दोन लाख ५० हजार रुपयांवर (विनाजीएसटी) होती. त्यात पाच हजारांची वाढ होऊन चांदी दोन लाख ५५ हजार प्रतिकिलो (विनाजीएसटी) पोहोचली आहे. तसेच सोने शुक्रवारी एक लाख ५३ हजार (प्रतिदहा ग्रॅम) विनाजीएसटी होते. त्यात दोन हजार ६०० रुपयांची वाढ झाली. सोने एक लाख ५५ हजार ६०० रुपये विनाजीएसटी (प्रतिदहा ग्रॅम) पोहोचले आहे.

Today's Gold - Silver Price
Maharashtra Infrastructure : मुंबई-नाशिकचा प्रवास मुंबई-पुण्यासारखा होणार, मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक, १० हजार कोटींचा मोठा निर्णय

सोन्या-चांदीचे नऊ दिवसांतील भाव

सोने प्रतिदहा ग्रॅम चांदी प्रतिकिलो (विनाजीएसटी)

५ फेब्रुवारी

सोने १ लाख ५३ हजार.

चांदी २ लाख ६५ हजार

६ फेब्रुवारी

सोने १ लाख ५२ हजार २००

चांदी २ लाख ५५ हजार

७ फेब्रुवारी

सोने १ लाख ५४ हजार ५००

चांदी २ लाख ६० हजार

९ फेब्रुवारी

सोने - १ लाख ५६ हजार.

चांदी - २ लाख ७० हजार

१० फेब्रुवारी.

सोने - १ लाख ५५ हजार ८००

चांदी - २ लाख ६८ हजार

११ फेब्रुवारी

सोने - १ लाख ५६ हजार ५००

चांदी - २ लाख ६६ हजार

१२ फेब्रुवारी

सोने १ लाख ५६ हजार.

चांदी २ लाख ६५ हजार

१३ फेब्रुवारी

सोने - १ लाख ५३ हजार...

चांदी - २ लाख ५० हजार

१४ फेब्रुवारी

सोने - १ लाख ५५ हजार ६००

चांदी - २ लाख ५५ हजार

Today's Gold - Silver Price
Gold Rate Today : 'व्हॅलेंटाईन डे'ला सोनं महागलं, प्रतितोळा ₹१९७०ने वाढले, वाचा 24K, 22K, 18K गोल्डचे ताजे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com