Ladki Bahin Yojana: ५ दिवसात लाडकीच्या खात्यात ₹३००० जमा होणार? जानेवारी-फेब्रुवारीच्या हप्ताबाबत मोठी अपडेट

Ladki Bahin Yojana January-February Installment Date: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. आता जानेवारी-फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On
Summary

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

५ दिवसात महिलांच्या खात्यात येणार ₹३०००

जानेवारी-फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत अपडेट

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला या जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. जानेवारी महिना संपून गेला तरीही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. आता फेब्रुवारी महिनादेखील संपत आला आहे तरीही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही. त्यामुळे महिलांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. याचसोबत आता जानेवारी-फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: eKYC करताना चूक झाली? दुरुस्तीची ही शेवटची संधी; वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

५ दिवसात महिलांच्या खात्यात जमा होणार ₹३०००? (Ladki Bahin Yojana 3000 Rupees Installment Come in 5 Days)

फेब्रुवारी महिना संपायला अवघे ५ दिवस बाकी आहेत. तरीही महिलांना पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे या ५ दिवसात महिलांच्या खात्यात कधीही पैसे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.जानेवारीच्या हप्त्यासाठी आता सामाजिक न्याय खात्यातून निधी वितरित करण्यात आला आहे. सामाजिक न्याय खात्याकडून जवळपास ९८ कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. याच निधीतून महिलांना जानेवारीचा हप्ता दिला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana update: ...तोपर्यंत 'लाडकी'च्या खात्यात ₹१५०० येणार नाहीत, मंत्रालयातून आली मोठी अपडेट

सामाजिक न्याय विभागाकडून निधी वितरित झाला असला तरीही महिलांना फक्त जानेवारीचा हप्ता देणार का, जानेवारी-फेब्रुवारीचा हप्ता एकत्र देणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आता हप्ता लांबणीवर गेल्याने दोन्ही हप्ते एकत्र दिले जाण्याची शक्यता आहे.अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com