Joint Bank Account : लग्न झालंय? मग पती-पत्नीने संयुक्त बँक खाते उघडाच! मिळतात हे 5 मोठे फायदे

Joint Account Benefits : लग्नानंतर पती-पत्नीने संयुक्त बँक खातं उघडल्यावर घरखर्च, बचत आणि आर्थिक नियोजन सोपं होऊ शकतं.
Joint Bank Account
Joint Bank Accountsaam tv
Published On: 

लग्नानंतर पती-पत्नीला घरखर्चापासून मुलांचं शिक्षण आणि बचतीपर्यंत अनेक गोष्टींचं नियोजन करावं लागतं. अशावेळी दोघाचे पैसे एकाच ठिकाणी ठेवण्यासाठी संयुक्त बँक खातं (Joint Account) हा चांगला पर्याय चांगला ठरू शकतो. पण असं खातं उघडण्यामागे नेमके फायदे काय? काही तोटेही आहेत का? खातं उघडण्याआधी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? जाणून घेऊयात.

घरखर्चाचा हिशेब ठेवणे सोपे

घरभाडे, किराणा, वीज-पाणी बिले, मुलांची शाळेची फी आणि इतर नियमित खर्च एकाच खात्यातून करता येतात. त्यामुळे महिन्याला घरखर्चासाठी किती पैसे खर्च झाले, याचा स्पष्ट हिशेब दोघांनाही ठेवता येतो.

भविष्यासाठी एकत्रित बचत

घर खरेदी, मुलांचे शिक्षण, सुट्ट्यांमधील प्रवास किंवा आपत्कालीन खर्चासाठी दोघेही संयुक्त खात्यात नियमित पैसे जमा करू शकतात. उत्पन्नानुसार प्रत्येक जण आपापले योगदान देऊ शकतो. त्यामुळे बचतीचे स्वतंत्र नियोजन करणे सोपे होते.

व्यवहारांमध्ये पारदर्शकता

खात्यात किती पैसे जमा झाले, किती काढले, किती शिल्लक आहेत, याची माहिती दोन्ही खातेदारांना मिळू शकते. त्यामुळे घरखर्च, बचतीबाबत दोघांमध्ये स्पष्टता राहते.

Joint Bank Account
Paytm : युपीआय पेमेंट करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! Paytm ची 'ही' सेवा होणार सुरू, RBI कडून महत्त्वाची मंजुरी

मासिक बजेट तयार करणे सोपे

घरखर्चासाठी स्वतंत्र खाते असल्यास आवश्यक खर्च आणि बचत यांची विभागणी करता येते. त्यामुळे महिन्याचे आर्थिक नियोजन करणे, खर्चावर नियंत्रण सोपे होते.

धोके नक्की कोणते?

पैसे काढण्यावरून वाद - काही संयुक्त खात्यांमध्ये दोघांपैकी कोणालाही स्वतंत्रपणे पैसे काढता येतात, तर काही खात्यांमध्ये व्यवहारांसाठी संमती आवश्यक असते.

विभक्त होण्याची परिस्थिती - भविष्यात पती-पत्नीत आर्थिक वाद किंवा विभक्त होण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास खात्यातील रक्कम आणि व्यवहारांचे अधिकार याबाबत अडचणी येऊ शकतात.

Joint Bank Account
AgriStack Farmer ID : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! AgriStack नोंदणी नसेल तर अडकू शकतात सरकारी योजनांचे पैसे; वाचा नोंदणीची प्रोसेस

एका खातेदाराचा मृत्यू झाल्यास - पती किंवा पत्नीपैकी एकाचा मृत्यू झाल्यास खात्यातील रक्कम वापरण्याची आणि त्यावर दावा करण्याची प्रक्रिया बँकेच्या नियमांनुसार होते. त्यामुळे नामनिर्देशित व्यक्तीची माहिती आणि खात्याशी संबंधित आवश्यक नोंदी अद्ययावत ठेवणे महत्त्वाचे आहे.

मजकूर थोडा अस्पष्ट असलेल्या ठिकाणी मी अंदाजाने वाचला आहे; काही शब्द तपासायचे असल्यास सांगा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.