Paytm : युपीआय पेमेंट करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! Paytm ची 'ही' सेवा होणार सुरू, RBI कडून महत्त्वाची मंजुरी

RBI Digital Payment Approval : Paytm युजर्ससाठी ही महत्त्वाची बातमी आहे. RBI ने Paytm Payments Services Limited ला डिजिटल पेमेंट आणि वॉलेट सेवांसाठी प्राथमिक मंजुरी दिली आहे.
RBI Digital Payment Approval
RBI Digital Payment Approvalsaam tv
Published On: 

आजच्या डिजिटल युगात ऑनलाइन पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आपण भाजी खरेदी करण्यापासून ते मोठ्या व्यवहारांपर्यंत बरेचजण UPI आणि डिजिटल वॉलेटचा वापर करतात. अशातच Paytm वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून पेटीएमच्या वॉलेटच्या सेवेशी संबंधित एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. त्यामुळे भविष्यात पेटीएम वॉलेट सेवा परत सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे.

RBI कडून पेटीएमला सुरुवातीची मंजुरी

पेटीएमची मूळ कंपनी One 97 Communications ने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, RBI ने तिची सहायक कंपनी Paytm Payments Services Limited (PPSL) हिला डिजिटल पेमेंट आणि वॉलेटसारख्या सेवा सुरू करण्याच्या दिशेने प्राथमिक मंजुरी दिली. ही मंजुरी १३ नोव्हेंबर रोजी देण्यात आल्याचं कंपनीने सांगितलं आहे. म्हणून पेटीएमसाठी डिजिटल पेमेंट व्यवसायात परत विस्तार करण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. पण, ग्राहकांनी ही बातमी ऐकून लगेच वॉलेट सेवा सुरू होईल, असा समज करून घेऊ नये.

RBI Digital Payment Approval
LPG Cylinder Price: आज रविवारी गॅस सिलिंडर महागला की स्वस्त झाला? मुंबई, दिल्लीसह पाहा इतर शहरांतले नवे दर

पेटीएम वॉलेट लगेच सुरू होणार का?

RBI कडून प्राथमिक मंजुरी मिळाली असली तरी पेटीएम वॉलेट सेवा तातडीने सुरी होणार नाही. कारण कंपनीला अजून रिझर्व्ह बँकेकडून अंतिम मंजुरी मिळवावी लागेल. ही शेवटची परवानगी मिळाल्यानंतरच कंपनीला ग्राहकांसाठी संबंधित वॉलेट सेवा सुरू करता येईल.

RBI Digital Payment Approval
LPG Gas Connection : नवीन गॅस कनेक्शन घ्यायचंय? घरबसल्या करा ऑनलाइन अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

RBI च्या नियमांचे पालन करणे आवश्यक

वॉलेट सेवा परत सुरू करण्यासाठी पेटीएमला RBI च्या ऑगस्ट २०२१ मधील नियमांचे तसेच त्यानंतर करण्यात आलेल्या बदलांना फॉलो करावं लागेल. यासाठी कंपनीला आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून RBI कडून Certificate of Authorisation (CoA) मिळवावं लागेल.

पेटीएम ग्राहकांनी काय लक्षात ठेवावे?

सध्या पेटीएम वॉलेट सेवा परत सुरू झालेली नाही. कंपनीला प्राथमिक मंजुरी मिळाली असली तरी अंतिम मंजुरीची प्रोसेस बाकी आहे. त्यामुळे पेटीएम वापरणाऱ्या ग्राहकांनी कंपनीकडून येणाऱ्या अधिकृत घोषणेची वाट पाहणं आवश्यक आहे. तोपर्यंत ग्राहक उपलब्ध असलेल्या इतर डिजिटल पेमेंट पर्यायांचा वापर करू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.