LPG Cylinder Price: आज रविवारी गॅस सिलिंडर महागला की स्वस्त झाला? मुंबई, दिल्लीसह पाहा इतर शहरांतले नवे दर

Gas Cylinder Rate : आज रविवार १५ नोव्हेंबरला घरगुती आणि व्यावसायिक LPG सिलिंडरचे दर शहरानुसार वेगवेगळे आहेत.
LPG Cylinder Price
LPG Cylinder Pricesaam tv
Published On: 

घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल झाला की त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या घरखर्चावर होतो. त्यामुळे दर महिन्याला LPG सिलिंडरच्या किमतींकडे ग्राहकांचं लक्ष असतं. आज रविवार १५ नोव्हेंबर रोजी गॅस सिलिंडर बुक करण्याचा विचार करत असाल तर, आधी तुमच्या शहरातले दर तपासून घ्या. सध्या उपलब्ध माहितीनुसार, घरगुती LPG सिलिंडरचे दर स्थिर आहेत. पण शहरानुसार किमतींमध्ये फरक पाहायला मिळतो.

LPG सिलिंडरच्या किमती कशावर ठरतात?

गॅस सिलिंडरच्या किमती ठरवताना आंतरराष्ट्रीय बाजारातले अनेक गोष्टींचा विचार केला जातो. कच्च्या तेलाच्या किमती, प्रोपेन आणि ब्युटेनचे आंतरराष्ट्रीय दर आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती यांचा थेट परिणाम LPG च्या दरांवर होतो. भारतात मोठ्या प्रमाणात इंधन आयात करत असल्यामुळेही शहरानुसार दर बदलतात.

मुंबई आणि दिल्लीमध्ये गॅस स्वस्त का?

मुंबई आणि दिल्लीमध्ये इतर काही शहरांच्या तुलनेत गॅस सिलिंडरचे दर कमी आहेत. मुंबईत बंदर आणि BPCL, HPCL सारख्या तेल रिफायनरीज असल्यामुळे गॅसच्या वाहतुकीचा खर्च कमी होण्यास मदत होते. तर दिल्लीला मथुरा आणि पानिपत रिफायनरीजमधून पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा होतो. त्यामुळे वाहतुकीवरील खर्च कमी राहतो.

LPG Cylinder Price
SBI Data Leak : SBI ग्राहकांच्या बँकेचा डेटा लीक; लाखो रेकॉर्ड चोरी, बँकेने उचललं मोठं पाऊल

पाहा शहरानुसार LPG सिलिंडरचे दर

दिल्लीतील घरगुती सिलिंडर - ९३९.५०, व्यावसायिक सिलिंडर - २,८२०

मुंबईतील घरगुती सिलिंडर - ९४१.५०, व्यावसायिक सिलिंडर - २७७४.५०

कोलकातातील घरगुती सिलिंडर - ९६८ , व्यावसायिक सिलिंडर - २९६४

पटनातील घरगुती सिलिंडर - १०३१.५०, व्यावसायिक सिलिंडर - ३,११०.५०

नोएडा घरगुती सिलिंडर - ९३९.५० , व्यावसायिक सिलिंडर - २,७५७.५०

LPG Cylinder Price
PF Update: आजच पीएफ जमा करण्याची शेवटची संधी! कंपनीने केली चूक तर व्याजासह भरावा लागणार मोठा दंड

गॅस बुक करण्यापूर्वी दर तपासा

LPG सिलिंडर बुक करण्याआधी आपल्या गॅस एजन्सीकडून किंवा अधिकृत ऑनलाइन बुकिंग सुविधेच्या मदतीने लागू असलेली किंमत तपासून घ्या. कारण स्थानिक कर आणि इतर खर्चांमुळे अंतिम दरात फरक असू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.