SBI Data Leak : SBI ग्राहकांच्या बँकेचा डेटा लीक; लाखो रेकॉर्ड चोरी, बँकेने उचललं मोठं पाऊल

SBI Server Hacked: स्टेट बँक ऑफ इंडियावर सायबर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लाखो रेकॉर्ड चोरी झाल्याचा दावा असून ग्राहकांनी ओटीपी, पासवर्ड आणि बँकिंग माहिती सुरक्षित ठेवावी.
SBI Data Leak
SBI Data Leak saam tv
Published On: 

देशातल्या सर्वात मोठ्या सरकारी बँकांपैकी एक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. SBI च्या सर्व्हरवर सायबर हल्ला करून लाखो रेकॉर्ड चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यामध्ये ग्राहकांची वैयक्तिक माहिती, बँक खातं आणि कर्ज अर्जाशी संबंधित कागदपत्रांचा समावेश असल्याचं सांगितलं जातं. महत्त्वाचं म्हणजेच १२ नोव्हेंबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली.

नेमका काय घडलं?

'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, १० ते १५ ऑक्टोबर या दिवसांमध्ये हा सायबर हल्ला झाला. नवी मुंबईतल्या सीबीडी बेलापूर या ठिकाणी असलेल्या SBI च्या ग्लोबल आयटी सेंटरमधल्या केंद्रीय सर्व्हरमध्ये सायबर गुन्हेगारांनी अनधिकृत प्रवेश केला. 'सिरियसिम' (Siriusim) नावाच्या हॅकर ग्रुपशी संबंधित व्यक्तींवर डेटा चोरीचा संशय व्यक्त करण्यात आला.

SBI Data Leak
PF Update: आजच पीएफ जमा करण्याची शेवटची संधी! कंपनीने केली चूक तर व्याजासह भरावा लागणार मोठा दंड

३.७५ लाख रेकॉर्ड चोरी झाल्याचा दावा

बँकेच्या तक्रारीनुसार, हॅकर्सनी जवळपास ३२ CSV फाइल्स चोरी केल्या. यामध्ये सुमारे ३.७५ लाख रेकॉर्ड असल्याचं सांगितलं जातं. याशिवाय JSON फाइल्स आणि २,७२१ PDF फाइल्सही चोरी झाल्याची माहिती आहे. या कागदपत्रांमध्ये जवळपास ४,२८० ग्राहकांची वैयक्तिक माहिती असल्याचा दावा करण्यात आला.

SBI Data Leak
8th Pay Commission: १ जानेवारी २०२६ पूर्वी रिटायर झालात? मग ८व्या वेतन आयोगाचा फायदा मिळणार की नाही? लगेचच घ्या जाणून

ग्राहकांची कोणती माहिती लीक झाली?

चोरी झालेल्या डेटामध्ये खालील माहितीचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

  • ग्राहकांची नावे आणि संपर्क क्रमांक

  • घराचे पत्ते आणि वैयक्तिक माहिती

  • बँक खाते उघडण्याचे फॉर्म

  • कर्ज अर्जाशी संबंधित कागदपत्रे

  • आर्थिक व्यवहारांशी संबंधित काही नोंदी

SBI ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?

सायबर सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, चोरी झालेल्या माहितीचा वापर करून ग्राहकांना फसवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे SBI ग्राहकांनी अनोळखी कॉल, SMS आणि ईमेलपासून सावध राहिलं पाहिजे. कोणत्याही व्यक्तीला OTP, ATM PIN, पासवर्ड किंवा बँकिंगशी संबंधित गोपनीय माहिती देऊ नका. संशयास्पद लिंकवर क्लिक करणंही टाळावं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.