मुलींच्या खात्यात थेट ₹1 लाख 1 हजार! लेक लाडकी योजनेची अर्ज प्रक्रिया सुरू; पात्रता अन् कागदपत्रे पाहा

Maharashtra Lek Ladki Yojana Online Application 2026: महाराष्ट्र सरकारच्या लेक लाडकी योजनेअंतर्गत पात्र मुलींना मिळणार १ लाख १ हजार रुपयांची आर्थिक मदत! ऑनलाइन अर्ज कसा करायचा? पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्जाची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.
LekLadkiYojana
LekLadkiYojanasaam tv
Published On: 

मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे, त्यांचे शिक्षण पूर्ण व्हावे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, या उद्देशाने महाराष्ट्र सरकारकडून ‘लेक लाडकी योजना’ राबवली जाते. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबातील मुलींना एकूण १ लाख १ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत या योजनेसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया असल्याने अनेक पालकांना सरकारी कार्यालये आणि अंगणवाडी केंद्रांच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. मात्र, आता या प्रक्रियेत महत्त्वाचा बदल करण्यात आला असून, पालकांना महाडीबीटी २.० पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करता येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

LekLadkiYojana
Paytm : युपीआय पेमेंट करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! Paytm ची 'ही' सेवा होणार सुरू, RBI कडून महत्त्वाची मंजुरी

लेक लाडकी योजना नेमकी काय आहे?

लेक लाडकी योजना हा महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाचा महत्त्वाचा उपक्रम आहे. या योजनेंतर्गत १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींच्या पात्र कुटुंबांना टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत दिली जाते. पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका असलेल्या पात्र कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ मिळतो. मुलीच्या जन्मापासून ते वयाची १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत एकूण १ लाख १ हजार रुपयांची मदत दिली जाते.

LekLadkiYojana
AgriStack Farmer ID : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! AgriStack नोंदणी नसेल तर अडकू शकतात सरकारी योजनांचे पैसे; वाचा नोंदणीची प्रोसेस

मुलींना टप्प्याटप्प्याने किती पैसे मिळणार?

या योजनेंतर्गत मुलीच्या शिक्षणाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आर्थिक मदत दिली जाते.

मुलीच्या जन्मानंतर - ५ हजार रुपये

इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर - ६ हजार रुपये

इयत्ता सहावीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर - ७ हजार रुपये

इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर - ८ हजार रुपये

वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर - ७५ हजार रुपये

LekLadkiYojana
मोठी बातमी! मुंबईत CNG दर पुन्हा वाढले, आज मध्यरात्रीपासून नवे दर, आता किती किंमत मोजावी लागणार?

अशा प्रकारे पात्र लाभार्थी मुलीला एकूण १ लाख १ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते. अंतिम ७५ हजार रुपयांचा लाभ मिळण्यासाठी संबंधित अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

लेक लाडकी योजनेसाठी पात्रता काय?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही निकष निश्चित केले आहेत.

लाभार्थी कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका असणे आवश्यक आहे.

मुलीचा जन्म १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा.

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

लाभ कुटुंबातील पहिल्या आणि दुसऱ्या मुलीसाठी लागू आहे.

दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची अट लागू होते.

लाभार्थी कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे.

LekLadkiYojana
Gold Price Today : खुशखबर! दिवाळीपूर्वी सोने-चांदी झालं स्वस्त! ग्राहकांसाठी मोठा दिलासा, जाणून घ्या आजचा भाव

अर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक?

लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करताना मुलीचा जन्म दाखला, पालकांचे आधार कार्ड, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, आधारशी जोडलेल्या बँक खात्याचे पासबुक आणि उत्पन्नाचा दाखला ही प्रमुख कागदपत्रे आवश्यक आहेत. तसेच पुढील शैक्षणिक टप्प्यांवरील लाभासाठी शाळेचे बोनाफाईड सर्टीफिकेट , तर दुसऱ्या मुलीसाठी लागू असलेल्या कुटुंब नियोजनाच्या अटीसंदर्भातील प्रमाणपत्र सादर करावे लागू शकते.

महाडीबीटी २.० पोर्टलवर ऑनलाइन अर्ज कसा कराल?

लेक लाडकी योजनेच्या अर्ज प्रक्रियेचे ऑनलाइन पद्धतीने डिजिटायझेशन करण्यात आल्याने पालकांना घरबसल्या अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. यासाठी पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

१. सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत महाडीबीटी २.० पोर्टलला भेट द्या.

२. पोर्टलवर नवीन अर्जदार म्हणून नोंदणी करा किंवा आधीपासून खाते असल्यास लॉगिन करा.

३. लॉगिन केल्यानंतर महिला व बालविकास विभागातील ‘लेक लाडकी योजना’ हा पर्याय निवडा.

४. अर्जामध्ये मुलीची आणि पालकांची आवश्यक माहिती अचूकपणे भरा.

५. योजनेसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा.

६. भरलेला अर्ज तपासून तो ऑनलाइन सबमिट करा आणि अर्ज क्रमांक जतन करून ठेवा.

ऑनलाइन अर्जामुळे पालकांना मोठा दिलासा

ऑनलाइन अर्ज सुविधेमुळे पालकांचा वेळ आणि प्रवासाचा खर्च वाचण्यास मदत होणार आहे. तसेच अर्जाची स्थिती ऑनलाइन तपासता येणार असल्याने प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येण्याची अपेक्षा आहे. अर्जाची छाननी, प्रशासकीय मंजुरी आणि पात्र लाभार्थ्यांना डीबीटीच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पार पाडण्याचा यामागील उद्देश आहे. त्यामुळे मुलींच्या शिक्षणाला आणि आर्थिक सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणाऱ्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र पालकांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत. अर्ज करण्यापूर्वी महाडीबीटी २.० पोर्टलवरील अधिकृत सूचना आणि योजनेच्या अटी तपासणे महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.