

सणासुदीच्या दिवसांमध्ये सोनं- चांदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गेल्या चार व्यावसायिक दिवसांमध्ये सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दिलेल्या माहितीनुसार, सोनं ४,७९६ रुपयांनी, तर चांदी तब्बल १६,५०३ रुपयांनी स्वस्त झालं आहे.त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) आकडेवारीनुसार, चांदीचा दर प्रति किलो ५,३६२ रुपयांनी घसरून १.९४ लाख रुपयांवर आला. गुरुवारी चांदीचा दर २ लाख रुपयांच्या आसपास होता. जवळपास दहा महिन्यांनंतर चांदी परत दोन लाख रुपयांच्या खाली आल्याची माहिती मिळाली. १६ ऑक्टोबर रोजी चांदीचा दर २.१० लाख रुपये प्रति किलो होता. त्यानंतर झालेल्या घसरणीमुळे चांदी खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १,०६४ रुपयांनी कमी होऊन १.४१ लाख रुपयांवर आला. २२ ऑक्टोबर रोजी सोन्याचा दर १.४३ लाख रुपये होता. गेल्या चार व्यावसायिक दिवसांमधल्या घसरणीमुळे सोन्याच्या किमतीतही मोठा फरक पडला आहे.
वेगवेगळ्या शहरांमध्ये सोनं-चांदीचे दर बदलण्यामागे वाहतूक आणि सुरक्षेचा खर्च, स्थानिक मागणी-पुरवठा, ज्वेलर्स असोसिएशनचे दर आणि व्यापाऱ्यांकडच्या जुन्या साठ्याची खरेदी किंमत अशी विविध कारणे आहेत. त्यामुळे एकाच दिवशी वेगवेगळ्या शहरांमधल्या दरांमध्ये फरक दिसू शकतो.
दिलेल्या माहितीनुसार, २९ जानेवारी रोजी चांदीचा दर ३.८६ लाख रुपये प्रति किलो या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. त्यानंतर चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. त्याच दिवशी सोन्यानेही १.७६ लाख रुपये प्रति १० ग्रॅम अशी उच्च पातळी गाठली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.