AgriStack Farmer ID : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! AgriStack नोंदणी नसेल तर अडकू शकतात सरकारी योजनांचे पैसे; वाचा नोंदणीची प्रोसेस

Farmer ID Registration 2026 : महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर ॲग्रीस्टॅक नोंदणी आणि Farmer ID अनिवार्य असणार आहे. ही नोंदणी घरबसल्या काही मिनिटांत करता येते.
AgriStack Farmer ID
AgriStack Farmer IDsaam tv
Published On: 

शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शेतकऱ्यांना सरकार दुष्काळामध्ये आर्थिक मदत करत आहे. तसेच सरकार विविध योजनांच्या द्वारे शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी आणि दैनंदिन खर्च निघावा म्हणून काही योजना राबवत आहे. पण शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आणि Farmer ID Card अनिवार्य करण्यात आलं आहे. मदत आणि पुर्नवसन मंत्री मकरंद जाधव यांनी शेतकऱ्यांना तातडीने ईकेवायसी प्रोसेस पूर्ण करण्याचं आवाहन केलं आहे.

आता शेतकऱ्यांना Farmer ID कसा मिळवता येईल? हा प्रश्न पडला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही ॲग्रीस्टॅक योजनेत नोंदणी केली की तुमच्या खात्यात दिवाळीआधी जाहीर झालेली मदत जमा होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना विविध योजनांचाही लाभ घेता येईल. त्यामध्ये कोणत्याही अडचणी येणार नाहीत.

AgriStack Farmer ID
Mumbai CNG Price Hike : मुंबईकरांना महागाईचा मोठा झटका! CNG पुन्हा महागला, आता मोजावे लागणार इतके रुपये

ॲग्रीस्टॅक योजनेत नोंदणी कशी करायची?

ॲग्रीस्टॅक योजनेत नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम युनिफाइड फार्मर सर्व्हिस इंटरफेस या अधिकृत संकेतस्थळावर जा. तिथे आधार नंबर आणि मोबाईलवर आलेला ओटीपी भरून घ्या. पुढे तुमच्या जमिनीची माहिती भरा. तिथे सातबारा आणि सर्व्हे क्रमांक तुम्हाला भरावा लागेल.

AgriStack Farmer ID
8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या एरियर्सचे पैसे एकरकमी मिळणार की हप्त्यांमध्ये? समोर आली अत्यंत महत्त्वाची माहिती

पुढे महसूल विभागाकडून संबंधित माहितीची तपासणा होते. मग पडताळणीपूर्ण झाल्यावर डिजिटल किसान आयडी मिळवता येतो.

महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांचे आधार कार्ड फोन नंबरला लिंक असायला हवं. तसेच जमिनीचे सर्व पुरावे, सातबारा असणंही आवश्यक आहे. तुम्ही ही नोंंदणी ऑनलाइन करू शकत नसाल तर जवळच्या सीएससी केंद्रात म्हणजेच नागरी सुविधा केंद्रात जाऊनही नोंदणी करू शकता. त्याने भविष्यात तुम्हाला कोणत्याही योजनांचा लाभ घेताना अडचणी येणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.