Mumbai CNG Price Hike : मुंबईकरांना महागाईचा मोठा झटका! CNG पुन्हा महागला, आता मोजावे लागणार इतके रुपये

CNG New Rate Mumbai : मुंबई आणि एमएमआर परिसरात महानगर गॅसने सीएनजी दरात प्रति किलो १.५० रुपयांची वाढ केली आहे.
Mumbai CNG Price Hike
Mumbai CNG Price Hikesaam tv
Published On: 

दिवाळीनंतर महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून अनेकजण सीएनजीचा वापर करतात. पण आता सीएनजीच्या किंमतीतही वाढ झालीये. मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातल्या वाहनधारकांना याचा फटका बसणार आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात प्रति किलो १.५० रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे सीएनजीचे नवे दर किती झाले आणि या दरवाढीचा सर्वसामान्यांच्या खिशावर किती परिणाम होईल हे जाणून घेऊयात.

मुंबईत सीएनजीचा नवे दर

महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात प्रति किलो १.५० रुपयांची वाढ केली. या दरवाढीनंतर मुंबई आणि आसपासच्या परिसरात सीएनजीचा दर ९१.५० रुपये प्रति किलो झाला. सुधारित दर रविवारपासून लागू करण्यात आले. त्यामुळे सीएनजीवर धावणाऱ्या वाहनांसाठी आता जास्त पैसे मोजावे लागतील.

Mumbai CNG Price Hike
LPG Gas Connection : नवीन गॅस कनेक्शन घ्यायचंय? घरबसल्या करा ऑनलाइन अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

११ महिन्यांत सीएनजी ११ रुपयांनी महागला

यंदाच्या वर्षात सीएनजीने ही आठव्यांदा दर वाढ केली. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत सीएनजीचा दर ८०.५० रुपये प्रति किलो होता. पण गेल्या ११ महिन्यात दरात ११ रुपयांची वाढ झाली. याआधी पुणे, नाशिक आणि धुळ्यात सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ केली होती.

Mumbai CNG Price Hike
8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या एरियर्सचे पैसे एकरकमी मिळणार की हप्त्यांमध्ये? समोर आली अत्यंत महत्त्वाची माहिती

रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मोठा फटका

CNG च्या दरवाढीचा सर्वात जास्त परिणाम रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर होईल. दररोज वाहन चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या चालकांचा इंधनावरचा खर्च वाढणार आहे. परिणामी त्यांच्या रोजच्या कमाईवर परिणाम होऊ शकतो.

सीएनजी महागण्यामागे काय कारण?

महानगर गॅस लिमिटेडच्या माहितीनुसार, नैसर्गिक वायूच्या खरेदी खर्चात वाढ झाल्याने CNG च्या किमती वाढवण्यात आल्या. जागितक स्तरावरच्या भू-राजकीय तणावामुळे गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम होतोय. तसेच सरकारकडून मिळणाऱ्या स्वस्त देशांतर्गत नैसर्गिक वायूच्या वाटपात घट झाल्याचाही परिणाम इंधनाच्या किमतींवर झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.