CNG-PNG महागला! मध्यरात्रीपासून नवे दर लागू, किती रुपयांनी वाढले दर?

CNG PNG Price Hike Pune Pimpri Chinchwad Nashik New Rates: पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नाशिकमध्ये CNG आणि PNG गॅस महागला. CNG दरात प्रतिकिलो 1.25 रुपये, तर PNG दरात प्रति SCM 1.50 रुपयांची वाढ झाली आहे.
CNG PNG PRICE HIKE
CNG PNG PRICE HIKEsaam tv
Published On: 

पुणेकरांसह पिंपरी-चिंचवड आणि नाशिकमधील नागरिकांना महागाईचा आणखी एक फटका बसणार आहे. CNG आणि घरगुती PNG गॅसच्या दरात वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने घेतला आहे. त्यानुसार, 12 आणि 13 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून नवीन दर लागू होणार आहेत. CNG च्या दरात प्रतिकिलो 1 रुपये 25 पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नाशिक जिल्ह्यात CNG चा नवीन दर 99 रुपये 75 पैसे प्रतिकिलो झाला आहे. तर घरगुती पाइप्ड नॅचरल गॅस म्हणजेच PNG च्या दरात प्रति SCM 1 रुपये 50 पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे PNG चा नवीन दर 51 रुपये 75 पैसे प्रति SCM असणार आहे.

CNG PNG PRICE HIKE
छटपुजेच्या नावाखाली नदीपात्रात मातीचा डोंगर; प्रशासन गप्प का? बदलापुरात संतापाचा उद्रेक!

गॅसच्या इनपुट खर्चात आणि आयात केलेल्या LNG च्या किमतीत वाढ झाल्यामुळे दरवाढीचा निर्णय घेतल्याचं महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान, पेट्रोलच्या तुलनेत CNG वापरल्यास 45 टक्के, तर डिझेलच्या तुलनेत 20 टक्क्यांहून अधिक बचत होत असल्याचा दावा MNGL ने केला आहे.

CNG PNG PRICE HIKE
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ३००० रुपये जमा होणार? दिवाळीआधी सरकार घेणार मोठा निर्णय; वाचा सविस्तर

एकीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत असताना आता वाहनचालकांसह घरगुती गॅस वापरणाऱ्या ग्राहकांनाही दरवाढीचा फटका बसणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.