छटपुजेच्या नावाखाली नदीपात्रात मातीचा डोंगर; प्रशासन गप्प का? बदलापुरात संतापाचा उद्रेक!

Badlapur Chhath Puja Controversy: बदलापुरात छटपुजेच्या नावाखाली उल्हास नदीपात्रात शेकडो ब्रास मातीचा भराव टाकल्याचा आरोप करण्यात येत आहे. ब्लू लाईन हद्दीत सुरू असलेल्या या कामाकडे तहसीलदार अमित पुरी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
BADLAPUR CHHATH PUJA CONTROVERSY
BADLAPUR CHHATH PUJA CONTROVERSYsaam tv
Published On: 

बदलापुरात छटपुजेचा वाद चांगलाच पेटलाय. छटपुजेच्या नावाखाली उल्हास नदी पात्रात शेकडो ब्रास मातीचा भराव टाकण्यात आलाय. विशेष म्हणजे एव्हढ्या मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकूनही तहसिलदार अमित पुरी यांनी त्याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय. त्यामुळे अमित पुरी नेमकं कुणाला पाठिशी घालतायेत असा सवाल आता विचारला जातोय. आयोजकांवर गुन्हे दाखल करून हे काम त्वरीत थांबवावं अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा स्थानिक सामाजिक कार्यकर्त्या संगीता चेंदवणकर तसंच मनसे पदाधिकाऱ्यांनी दिलाय.

BADLAPUR CHHATH PUJA CONTROVERSY
Shocking : नाशिक हादरलं! इंजिनिअरने राहत्या घरी संपवलं आयुष्य, मृत्यपूर्वी लिहलं पत्र; धक्कादायक कारण समोर

बदलापुरात उत्तर भारतीयांची संख्या मोठी असून छटपुजेसाठी उल्हास नदीवर जय्यत तयारी सुरू आहे. जेसीबी आणि डंपरच्या सहाय्यानं याठिकाणी मोठ्या प्रमाणात मातीचा भराव उल्हास नदीत टाकण्याचं काम सुरू आहे. उल्हास नदीचा परिसर हा सरकारनं ब्लू लाईन घोषित केलाय. त्यामुळे उल्हास नदीच्या पात्रात किंवा 'ब्लू लाईन' हद्दीत कोणत्याही प्रकारचा मातीचा भराव टाकण्यास कायद्यानं सक्त मनाई आहे. नदीचा नैसर्गिक प्रवाह बाधित होईल असं कोणतंही काम हा गंभीर पर्यावरणीय गुन्हा मानला जातो, असं असतानाही याठिकाणी बिनदिक्कतपणे मातीचा भराव टाकला जात आहे.

BADLAPUR CHHATH PUJA CONTROVERSY
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! परीक्षेच्या वेळेत ४५ मिनिटांचा बदल; नवीन टाइम काय?

प्रशासनाकडून कडक कारवाई अपेक्षित असताना तहसिलदार मूग गिळून गप्प आहेत. त्यामुळे त्यांचा या मातीच्या भरावाला अप्रत्यक्ष पाठिंबा आहे का? असा आरोप बदलापूरकरांकडून केला जातोय. गणेशोत्सव काळात प्रशासनाच्या वतीने उल्हास नदीत गणेशमूर्ती विसर्जनाला मज्जाव करण्यात आला होता. मग हाच नियम छटपुजेसाठी का नाही असा प्रश्न विचारला जातोय. तहसीलदार अमित पुरी यांनी यावर तात्काळ कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संगीता चेंदवणकर तसच मनसे पदाधिकाऱ्यांनी दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.