दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! परीक्षेच्या वेळेत ४५ मिनिटांचा बदल; नवीन टाइम काय?

ICSE Class 10 Board Exam Timetable 2027: ICSE आणि ISC बोर्डाच्या २०२७ च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. बारावीची परीक्षा ९ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
CISCE board exam dates February 2027
CISCE board exam dates February 2027saam tv
Published On: 

कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (CISCE) बोर्डाने २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार बारावीची (ISC) परीक्षा ९ फेब्रुवारीपासून, तर दहावीची (ICSE) परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. दोन्ही परीक्षांसाठी देश-विदेशातील एकूण ३ लाख ७९ हजार ९८० विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत.दहावीच्या परीक्षेच्या वेळेत महत्त्वाचा बदल यंदाच्या परीक्षेत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वेळापत्रकात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. परीक्षेची वेळ यापूर्वीच्या तुलनेत ४५ मिनिटे अलीकडे आणण्यात आली आहे. यापूर्वी सकाळी १०.४५ वाजता प्रश्नपत्रिका वाचनासाठी दिली जात होती आणि ११ वाजता प्रत्यक्ष लेखनाला सुरुवात होत होती. मात्र, २०२७ पासून सकाळी १० वाजता प्रश्नपत्रिका दिली जाणार असून १०.१५ वाजता लेखनाला सुरुवात होईल. विद्यार्थ्यांना सकाळी ९.४५ वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक असेल.

CISCE board exam dates February 2027
Mumbai cocaine seizure: मेकअप आर्टिस्टच्या घरात आढळला कोकेनचा साठा! आंतरराष्ट्रीय तस्करीचं कनेक्शन समोर

बारावीची परीक्षा ८ एप्रिलपर्यंत, तर दहावीची ३१ मार्चपर्यंत

बारावीची परीक्षा ९ फेब्रुवारी ते ८ एप्रिल २०२७ या कालावधीत पार पडणार आहे. तर दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत होणार आहे. परीक्षांची प्रवेशपत्रे डिसेंबरच्या मध्यापासून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत. विषयानुसार सविस्तर वेळापत्रक बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

CISCE board exam dates February 2027
Chhath Puja : मुंबईनंतर बदलापुरात छट पूजेवरून राजकीय वातावरण तापलं, मनसे आक्रमक

महाराष्ट्रातील ३५ हजारांहून अधिक विद्यार्थी देणार परीक्षा

देश-विदेशातील ३ हजार १०६ शाळांमधील सुमारे २ लाख ७० हजार विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा २ हजार ८३५ केंद्रांवर ७६ विषयांसाठी घेतली जाणार आहे. तर बारावीच्या परीक्षेसाठी १ हजार ६५१ शाळांमधील १ लाख १० हजार २५ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. ही परीक्षा एकूण १ हजार ४७७ केंद्रांवर होणार आहे. महाराष्ट्रातून बारावीच्या परीक्षेसाठी ४ हजार ६६०, तर दहावीच्या परीक्षेसाठी ३१ हजार ३५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे राज्यातून एकूण ३५ हजार ६९५ विद्यार्थी या परीक्षांना सामोरे जाणार आहेत. क्षमता आधारित मूल्यांकनावर भर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या उद्दिष्टांनुसार यंदाच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांची केवळ पाठांतराची क्षमता तपासण्याऐवजी विषयांची संकल्पनात्मक समज, चिकित्सक विचार करण्याची क्षमता आणि समस्या सोडविण्याचे कौशल्य तपासण्यावर भर दिला जाणार आहे.

CISCE board exam dates February 2027
DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पगारात होणार वाढ, ४ महिन्यांचे पैसेही मिळणार; पाहा कोणाला फायदा?

विद्यार्थ्यांना २१ व्या शतकातील आव्हानांसाठी तयार करण्याच्या दृष्टीने क्षमता आधारित मूल्यांकन पद्धतीला प्राधान्य दिले जाणार आहे.

परीक्षा प्रणालीतील निष्पक्षता आणि प्रशासकीय पारदर्शकता कायम ठेवून प्रत्येक विद्यार्थ्याला ज्ञान सिद्ध करण्याची समान संधी देण्याचा प्रयत्न असल्याचे सीआयएससीईचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सचिव डॉ. जोसेफ इमॅन्युएल यांनी स्पष्ट केले आहे.

परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे

बारावी (ISC) परीक्षा : ९ फेब्रुवारी ते ८ एप्रिल २०२७

दहावी (ICSE) परीक्षा : १५ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२७

दहावीच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका : सकाळी १० वाजता

प्रत्यक्ष लेखनाची सुरुवात : सकाळी १०.१५ वाजता

परीक्षा केंद्रावर उपस्थिती : सकाळी ९.४५ पर्यंत

प्रवेशपत्रे : डिसेंबरच्या मध्यापासून

अधिकृत संकेतस्थळ : https://cisce.org/

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.