मयुरेश कडव, बदलापूर प्रतिनिधी
छटपूजेवरून बदलापुरात राजकीय वातावरण तापलय. बदलापुरातील उल्हास नदीवर केल्या जाणाऱ्या छटपूजेला मनसेनं विरोध दर्शविलाय. प्रशासनाकडून उल्हास नदीकाठी छटपूजेची पूर्वतयारी केली जातेय. एकीकडे गणपती विसर्जनास नदीपात्रात निर्बंध आणायचे आणि छटपूजेसाठी पायघड्या टाकायच्या असा सवाल उपस्थित करत बदलापुरात मनसे आक्रमक झालीय. मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भूमिका ही पहिल्यापासूनच छटपूजे विरोधात होती. तीच भूमिका आजही असल्याचं म्हणत मनसेनं आपला विरोध कायम ठेवलाय.
बदलापुरातील उल्हास नदी आधीच जल प्रदूषणाच्या विळख्यात आहे. असं असताना छटपूजेचं निर्माल्य नदीत सोडू दिलं जाणार नाही. यासाठी कृत्रिम तलाव निर्माण करून प्रशासनाने सोय करावी अशी मागणी मनसेची आहे. मनसेचा विरोध छटपूजेला नाही तर यातून परप्रांतीच्या माध्यमातून दाखवणाऱ्या ताकदीला आहे. परप्रांतीयांची मग्रूरी दिवसेंदिवस वाढतीय. त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठी मराठी सणांसाठी निर्बंध आणायचे आणि छटपूजेसाठी परवानगी द्यायची असा दुजाभाव का? असा सवाल देखील मनसेनं उपस्थित केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.