DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पगारात होणार वाढ, ४ महिन्यांचे पैसेही मिळणार; पाहा कोणाला फायदा?

UP Government : उत्तर प्रदेश सरकारने दिवाळीआधी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठं गिफ्ट दिलं आहे.
DA Hike
DA Hikesaam tv
Published On: 

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने राज्यातल्या सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठं गिफ्ट दिलं आहे. सरकारने महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) मध्ये ३ टक्क्यांची वाढ जाहीर केली. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना ६० टक्क्यांऐवजी ६३ टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातल्या तब्बल २७.८७ लाख कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे.

२७.८७ लाख कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा

उत्तर प्रदेश सरकारच्या या निर्णयाचा राज्यातल्या १६.३५ लाख सरकारी कर्मचारी आणि ११.५२ लाख पेन्शनधारकांना फायदा मिळेल. वित्त विभागाचे प्रमुख सचिव आलोक कुमार यांनी यासंदर्भात आदेश जारी केला . वाढीव महागाई भत्ता १ जुलैपासून लागू करण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्यांची थकबाकीही मिळेल.

DA Hike
Bank Holidays November : १० आणि ११ नोव्हेंबरला बँका बंद! तुमच्या शहराचं नाव यादीत आहे का?

नोव्हेंबरच्या पगारासोबत वाढीव DA मिळणार

कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्त्याची रक्कम नोव्हेंबरच्या वेतनासोबत डिसेंबरमध्ये दिली जाणार आहे. तर जुलै ते ऑक्टोबर या कालावधीतील थकबाकी भविष्य निर्वाह निधी (GPF) खात्यात किंवा बचत प्रमाणपत्रांच्या माध्यमातून जमा केली जाणार आहे.

NPS अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीतील १० टक्के रक्कम टियर-१ पेन्शन खात्यात जमा होईल. तर उरलेली ९० टक्के रक्कम PPF खात्यात किंवा NSC स्वरूपात दिली जाणार आहे. याशिवाय सरकारकडून नियोक्ता म्हणून १४ टक्के योगदानही जमा केले जाईल.

DA Hike
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ₹३,००० मिळणार? सप्टेंबर - ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

पेन्शनधारकांना चार महिन्यांची थकबाकी मिळणार

राज्यातल्या ११.५२ लाख पेन्शनधारकांच्या महागाई राहत (DR) मध्येही ३ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. आता त्यांना ६३ टक्के दराने महागाई राहत मिळेल. नोव्हेंबर महिन्याच्या पेन्शनसोबत डिसेंबरमध्ये चार महिन्यांची थकबाकीही दिली जाणार आहे.

सरकारच्या तिजोरीवर ९५२ कोटींचा भार

तर सरकारच्या या निर्णयामुळे उत्तर प्रदेश सरकारच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडणार आहे. वाढीव DA आणि DR मुळे दरमहा सुमारे २३६ कोटी रुपयांचा जास्तीचा खर्च अपेक्षित आहे. तर डिसेंबर महिन्यातच सरकारला सुमारे ९५२ कोटी रुपये खर्च करावं लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.