

बँकेशी संबंधित महत्त्वाची कामं असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. नोव्हेंबर महिन्यात सण आणि स्थानिक सुट्ट्यांमुळे काही शहरांमध्ये बँकांचे कामकाज बंद राहील. विशेष म्हणजे, १० आणि ११ नोव्हेंबर रोजी देशातल्या काही निवडक शहरांमध्ये बँकांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे बँकेत जाण्याआधी तुमच्या शहरातल्या सुट्ट्यांची माहिती जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
मंगळवार, १० नोव्हेंबर रोजी मुंंबई, अहमदाबाद, नागपूर, बेलापूर, बंगळुरू, डेहराडून आणि गंगटोक या ठिकाणी RBI केंद्रांशी संबंधित बँकांना सुट्टी असेल. या दिवशी संबंधित शहरांमधल्या बँकांच्या शाखांमध्ये ग्राहकांना नियमित काउंटर सेवा वापरता येईल. चेक क्लिअरन्ससारख्या कामांना पुढच्या कामकाजाच्या दिवसापर्यंत वाट पाहायला लागू शकते.
बुधवार, ११ नोव्हेंबर रोजी कोलकाता, लखनऊ, कानपूर, शिमला, इंफाळ आणि गंगटोक या शहरांमध्ये बँकांना सुट्टी असेल. त्यामुळे या शहरांमध्ये बँकेत जाऊन पैसे जमा करणे, चेक जमा करणे, डिमांड ड्राफ्ट बनवणे किंवा लॉकरचा वापर करणे यांसारखी कामे करता येणार नाहीत.
बँकांच्या शाखा बंद असल्या तरी ग्राहकांना डिजिटल व्यवहार करता येतील. UPI आणि IMPS सेवा नेहमीसारख्याच सुरू राहतील. तसेच नेट बँकिंगच्या माध्यमातून NEFT आणि RTGS द्वारे पैसे ट्रान्सफर करता येतील. ATM मधून पैसे काढण्याची सुविधाही सुरू राहणार आहे. मात्र, सुट्ट्यांमुळे काही ठिकाणी ATM मध्ये पैसे भरायला उशीर होऊ शकतो.
१० नोव्हेंबर रोजी NSE आणि BSE या दोन्ही शेअर बाजारांमध्ये पूर्ण दिवसाची सुट्टी असणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपले व्यवहार आणि आर्थिक नियोजन त्यानुसार करणं महत्त्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.