EPFO WhatsApp Service : फक्त 'Hi' मेसेज करा अन् PF खात्यात किती पैसे आहेत ते जाणून घ्या! EPFO ची भन्नाट सुविधा

EPFO PF Balance Check : EPFO ने कर्मचाऱ्यांसाठी WhatsApp वर पीएफ बॅलन्स तपासण्याची सुविधा सुरू केली आहे.
EPFO WhatsApp Service
EPFO WhatsApp Servicemeta ai
Published On: 

नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता पीएफ खात्यात किती पैसे जमा आहेत, हे तपासण्यासाठी EPFO च्या वेबसाइटवर जाण्याची गरज नाही. कर्मचारी WhatsApp वरून पीएफ बॅलन्स तपासू शकतात. तसेच शेवटचे ५ व्यवहार पाहण्यासोबतच पासबुकही डाउनलोड करता येईल.

EPFO ची WhatsApp सेवा सुरू

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) सदस्यांसाठी ही नवीन सुविधा सुरू केलीये. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी EPFO च्या ७४ व्या स्थापना दिनानिमित्त या सुविधेचे उद्घाटन केलं आहे. त्यासाठी तुम्हाला +91 8796441800 हा अधिकृत WhatsApp क्रमांक उपलब्ध करून दिलाय. तुम्हाला यावर तुमच्या पीएफ संदर्भातली सगळी माहिती मिळेल.

EPFO WhatsApp Service
Ladki Bahin Yojana : लक्ष्मीपूजन झालं, आता लाडकी बहिणीच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर

WhatsApp वर कोणत्या सुविधा मिळणार?

EPFO च्या या सुविधेमुळे कर्मचाऱ्यांना चार महत्त्वाच्या सेवा मिळतील.

१. PF बॅलन्स - खात्यात किती रक्कम जमा आहे, हे तपासता येईल.

२. शेवटचे ५ व्यवहार - खात्यातील अलीकडील पाच व्यवहारांची माहिती मिळेल.

३. पासबुक डाउनलोड - कर्मचारी आणि कंपनीने जमा केलेल्या योगदानाची माहिती पाहता येईल.

४. PMVBRY मार्गदर्शन - प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेशी संबंधित माहिती मिळेल.

EPFO WhatsApp Service
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ८व्या वेतन आयोगात लाखोंची थकबाकी मिळण्याची शक्यता, वाचा नवीन अपडेट

WhatsApp वर PF बॅलन्स कसा तपासायचा?

सर्वात आधी +91 8796441800 हा EPFO चा अधिकृत क्रमांक सेव्ह करा. मग WhatsApp वर जाऊन या क्रमांकावर 'Hi' असा मेसेज पाठवा. त्यानंतर भाषेचा पर्याय निवडा. स्क्रीनवर PF Balance, Last 5 Transactions आणि Download Passbook असे ऑप्शन दिसतील. तुम्हाला हवा असलेला पर्याय निवडून OTP येईल तो त्यामध्ये टाका. त्यानंतर तुम्हाला लगेचच पीएफ खात्याची संपूर्ण माहिती मिळेल.

पासबुकही करता येणार डाउनलोड

WhatsApp वरून EPF पासबुक डाउनलोड करण्यासाठी अधिकृत क्रमांकावर 'Hi' पाठवा. त्यानंतर 'Download Passbook' हा पर्याय निवडा. आवश्यक पडताळणी पूर्ण केल्यानंतर संबंधित पीएफ खात्याचे पासबुक डाउनलोड करता येईल. या सुविधेमुळे कर्मचाऱ्यांना पीएफ खात्यातील जमा रक्कम आणि व्यवहार तपासणे जास्त सोपं झालं आहे. मात्र, खात्याच्या सुरक्षिततेसाठी फक्त EPFO च्या अधिकृत क्रमांकाचाच वापर करा. UAN पासवर्ड, बँक तपशील आणि OTP कोणासोबतही शेअर करू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.