Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ₹३,००० मिळणार? सप्टेंबर - ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Maharashtra Government : लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर हप्त्याची प्रतीक्षा कायम आहे. दोन्ही हप्ते एकत्र मिळाल्यावर महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा होऊ शकतात.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojanasaam tv
Published On: 

Ladki Bahin Yojana Installment Update: लाडक्या बहि‍णींचा सप्टेंबरचा हप्ता अजून खात्यात जमा झालेला नाही. त्यातच ऑक्टोबर महिना संपायला अवघे ५ दिवस उरलेले आहेत. अशातच लाडक्या बहि‍णींमध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा ३००० रुपयांचा हप्ता एकत्र मिळेल अशी चर्चा आहे. त्यामुळे आता लाभार्थ्यांचे लक्ष राज्य सरकारच्या निर्णयाकडे लागलं आहे.

लाडक्या बहि‍णींना मिळणार ₹३,०००?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र जमा झाल्यावर महिलांच्या खात्यात एकूण ३,००० रुपये येऊ शकतात. दिवाळीच्या काळात घरखर्च आणि सणाच्या खरेदीसाठी ही रक्कम उपयोगी ठरेल. मात्र, दोन्ही हप्ते एकत्र देण्याबाबत राज्य सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे महिलांना ३,००० रुपये मिळणार की सप्टेंबरचा १५०० रुपयांचा हप्ता स्वतंत्रपणे जमा होणार, हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ₹१५०० की ₹३००० रुपये मिळणार? सप्टेंबर-ऑक्टोबर हप्त्याबाबत राज्य सरकारचा उद्या घेणार मोठा निर्णय

मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे महिलांचे लक्ष

रखडलेल्या हप्त्याबाबत राज्य सरकार काय निर्णय घेणार, याची उत्सुकता लाभार्थींमध्ये आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावर निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण बैठकीत हप्त्याच्या वितरणाबाबत चर्चा होणार का किंवा नेमका निर्णय काय असेल, याची अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याने कोणताही निष्कर्ष काढणं घाईचं ठरेल.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर संपायला ६ दिवस उरले, लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये कधी येणार?

लाडकी बहीण योजनेचा लाभ कोणाला मिळतो?

महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने बँक खात्यात दिले जातात. योजनेच्या पात्रतेनुसार साधारणपणे २१ ते ६५ वर्षे वयोगटातल्या महिला लाभासाठी पात्र ठरतात. इतर अटींची पूर्तता करणंही आवश्यक आहे.

महिलांनी काय करावं?

लाभार्थी महिलांनी आपल्या बँक खात्याची स्थिती तपासावी आणि आवश्यक असल्यावर ई-केवायसीसह योजनेशी संबंधित तपशील अपडेट ठेवा. हप्त्याची तारीख किंवा रक्कम याबाबत सोशल मीडियावरचे अपुष्ट संदेशांवर विश्वास ठेवण्याऐवजी शासनाच्या अधिकृत घोषणांची वाट पाहा. सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे दोन्ही हप्ते एकत्र मिळाल्यास ₹३,००० मिळू शकतात. पण अधिकृत पुष्टी होईपर्यंत ही केवळ शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com