Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ₹१५०० की ₹३००० रुपये मिळणार? सप्टेंबर-ऑक्टोबर हप्त्याबाबत राज्य सरकारचा उद्या घेणार मोठा निर्णय

Ladki Bahin Yojana Installment Update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana meta ai
Published On: 

Ladki Bahin Yojana Installment Update: लाडक्या बहि‍णींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे महिलांचं लक्ष लागलं आहे. दिवाळीचा सण जवळ आलेला असताना महिलांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. तर उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. सप्टेंबर महिन्याचा हप्ता अजून जमा झालेला नसल्यामुळे सरकारच्या पुढच्या निर्णयाची वाट पाहावी लागणार आहे.

महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाल्यावर आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे पैसे कधी मिळणार, याबाबत लाभार्थींमध्ये उत्सुकता आहे.

Ladki Bahin Yojana
GST New Rules 2026 : १ नोव्हेंबरपासून GST चे नियम बदलणार? छोट्या व्यापाऱ्यांसाठी आली मोठी खुशखबर

लाडक्या बहि‍णींना १५०० की ३००० रुपये मिळणार?

सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र जमा झाल्यावर पात्र महिलांच्या खात्यात एकूण ३,००० रुपये येऊ शकतात. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी आणि घरखर्चासाठी महिलांना आर्थिक मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जातेय. पण बैठकीत नेमका कोणता निर्णय घेतला जाणार, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र देण्याबाबत सरकारकडून अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे महिलांच्या खात्यात ३,००० रुपये जमा होणार की फक्त सप्टेंबरचे १,५०० रुपये मिळणार, याबाबत स्पष्टता आलेली नाही.

Ladki Bahin Yojana
Silver Rate Today: चांदी तब्बल ₹२.२३ लाखांनी स्वस्त! मग धनत्रयोदशीला चांदी खरेदी करायची? तज्ज्ञ काय सांगतात?

भाऊबीजेला मिळणार, ३००० रुपयांची भेट?

सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे हप्ते एकत्र मिळाल्यावर महिलांना भाऊबीजेच्या काळात ३,००० रुपये मिळू शकतात, अशी चर्चा आहे. अन्यथा सप्टेंबर महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता स्वतंत्रपणे जमा होण्याची शक्यता आहे. पण या दोन्ही शक्यता असून अधिकृत निर्णयाची वाट पाहावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com