

Ladki Bahin Yojana September Installment Date 2026 : दिवाळीसारख्या मोठ्या सणांसाठी महिलांना आर्थिक मदतीची गरज असते. अशा वेळेस सरकारी योजना महिलांसाठी दिलासा देणाऱ्या ठरतात. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांचा हप्ता दिला जातो. पण ऑक्टोबर संपायला फक्त ६ दिवस उरलेले आहेत आणि अजून महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. तसेच ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये मिळाल्यावर सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे पैसे कधी खात्यात जमा होणार, असा प्रश्न महिलांकडून उपस्थित केला जातोय.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. सध्या सप्टेंबर महिन्याचा हप्ता रखडल्यामुळे लाभार्थी महिलांचं लक्ष सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीआधी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जातेय. पण याबद्दल सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही.
लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचे १५०० रुपये आणि ऑक्टोबर महिन्याचे १५०० रुपये असे एकूण ३००० रुपये एकत्र मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय. असं झाल्यावर महिलांना दिवाळीच्या खरेदीसोबत घरखर्चासाठी आर्थिक मदत मिळू शकते. पण दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र जमा करण्याबद्दल अजून अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही. त्यामुळे लाभार्थींनी अधिकृत घोषणेची वाट पाहावी.
महाराष्ट्र सरकारने महिलांचं आर्थिक स्वातंत्र्य वाढवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातल्या पात्र महिलांच्या बँक खात्यात डीबीटीच्या मदतीने १५०० रुपये जमा केले जातात. मिळालेल्या माहितीनुसार, योजनेत ई-केवायसी आणि पात्रतेच्या पडताळणीनंतर अनेक महिलांची नावं लाभार्थी यादीतून काढून टाकण्यात आली होती.
ऑक्टोबर महिना संपल्यावर काहीच दिवस शिल्लक असल्याने लाडक्या बहिणींना हप्ता कधी मिळणार, याची उत्सुकता आहे. पण पैसे जमा होण्याची निश्चित तारीख किंवा सप्टेंबर-ऑक्टोबरचे ३००० रुपये एकत्र मिळण्याबाबत सरकारने अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे महिलांनी अफवांवर विश्वास न ठेवता शासनाच्या अधिकृत घोषणांकडे लक्ष द्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.