Mumbai cocaine seizure: मेकअप आर्टिस्टच्या घरात आढळला कोकेनचा साठा! आंतरराष्ट्रीय तस्करीचं कनेक्शन समोर

Makeup artist arrested: मुंबईतील गोरेगावमध्ये बांगूरनगर पोलिसांनी मेकअप आर्टिस्टला कोकेन विक्रीप्रकरणी अटक केली. आरोपीच्या मालाडमधील घराच्या पोटमाळ्यावरून ६७२ ग्रॅमसह एकूण ६७८ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ३ कोटी ३६ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
Mumbai cocaine seizure
Mumbai cocaine seizuresaam tv
Published On: 

संजय गडदे, प्रतिनिधी

झटपट पैसे कमावण्याच्या नादात मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करणारा एक तरुण कोकेन विक्रीच्या व्यवसायात उतरल्याचा प्रकार समोर आलाय. गोरेगावमध्ये बांगूरनगर पोलिसांनी कारवाई करत फुलचंद ईश्वरदयाल कश्यप (३१) याला अटक केली आहे. त्याच्याकडून ६७८ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले असून त्याची किंमत ३ कोटी ३६ लाख रुपये आहे. विशेष म्हणजे, आरोपीने मालाडमधील आपल्या घराच्या पोटमाळ्यावर कोकेनचा मोठा साठा लपवून ठेवला होता. पोलिसांनी या कारवाईत कोकेन, मोबाईल आणि इतर साहित्य असा एकूण ३ कोटी ३८ लाख ९८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

बांगूरनगर पोलीस ठाण्याचे एटीएस पथक सोमवारी, २ नोव्हेंबर रोजी परिसरात गस्त घालत होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश कोंडूभैरी, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत कर्पे, पोलीस हवालदार संदीप संकपाळ आणि पोलीस शिपाई मच्छिंद्र खेडकर व रोहित ओवळकर हे गोरेगावमधील लिंक रोडवरील शिवम सोसायटीच्या दक्षिण वाहिनीवर रात्री पावणेनऊच्या सुमारास गस्त घालत होते.

Mumbai cocaine seizure
Kidney damage: शरीरात हे 5 बदल दिसले तर लगेच डॉक्टरांकडे जा; किडनी खराह होण्यापूर्वी दिसतात लक्षणं

यावेळी पोलिसांना एक तरुण संशयास्पदरीत्या फिरताना दिसला. पोलिसांनी त्याला थांबण्यास सांगितले. मात्र, त्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला जागीच पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ६ ग्रॅम कोकेन आणि एक मोबाईल फोन सापडला.

Mumbai cocaine seizure
Shiv Sena: मोठी बातमी! उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना एकत्र येणार? दिग्गज नेत्याच्या विधानाने राजकारणात खळबळ

पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता त्याने आपल्या घरातही कोकेनचा साठा ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याला सोबत घेऊन मालाडमधील मढ व्हिलेजमधील जरीमरी माता मंदिर रोडवरील मामू गल्लीतील त्याच्या घरी छापा टाकला. घराची झडती घेतली असता पोटमाळ्यावर लपवून ठेवलेले ६७२ ग्रॅम कोकेन पोलिसांना सापडले.

पोलिसांनी या कारवाईत एकूण ६७८ ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकेनची किंमत ३ कोटी ३६ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलीस शिपाई मच्छिंद्र खेडकर यांच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याला अटक करून बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.

अटक करण्यात आलेला फुलचंद कश्यप हा मूळचा उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील गंगाघाटमधील रहिवासी आहे. तो मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करतो. गेल्या काही वर्षांपासून तो मालाडच्या मढ व्हिलेज परिसरात राहत होता. झटपट पैसे कमावण्यासाठी त्याने कोकेन विक्रीचा व्यवसाय सुरू केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

Mumbai cocaine seizure
Diwali firecracker accident: फटाके फोडताना अचानक २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू; पोलिसांकडून अधिक तपास सुरु

दरम्यान, आरोपीला कोकेनचा पुरवठा कोण करत होते, तो हा साठा कोणाला विकणार होता, यापूर्वीही त्याने ड्रग्जची विक्री केली आहे का आणि या व्यवसायात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास बांगूरनगर पोलीस करत आहेत. आरोपीच्या संपर्कात असलेल्या इतर संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.