Shiv Sena: मोठी बातमी! उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना एकत्र येणार? दिग्गज नेत्याच्या विधानाने राजकारणात खळबळ

Shiv Sena Merger Buzz: शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी याबाबत मोठे विधान केले.
Shivsena: मोठी बातमी! उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना एकत्र येणार? दिग्गज नेत्याच्या विधानाने राजकारणात खळबळ
Shiv SenaSaam Tv
Published On: 

राज्यात लवकरच मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेदरम्यान आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना एकत्र येणार असल्याच्या चर्चांना देखील उधाण आले आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना पक्ष एकत्र येण्याबाबत मोठं विधान केले. 'दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर सर्वाधिक आनंद मलाच होईल.', असं विधान ओमराजे निंबाळकरांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकारणात खळबळ उडाली.

महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना वेळोवेळी उधाण येत असताना धाराशिवचे शिंदेंचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या एका वक्तव्याने या चर्चेला आणखी बळ मिळालं आहे. 'दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर माझ्यापेक्षा जास्त आनंदी माणूस दुसरा कोणीही नसेल.' असं स्पष्ट वक्तव्य ओमराजे निंबाळकर यांनी केलं आहे. ओमराजेंच्या या विधानामुळे ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या संभाव्य एकत्रिकरणाच्या चर्चेला पुन्हा एकदा राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे. मात्र, दोन्ही गटांच्या एकत्र येण्याबाबत प्रत्यक्षात काही राजकीय हालचाली होणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याने दोन शिवसेना एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली. दोन शिवसेना एकत्र येण्याबाबत मंत्री भरत गोगावले यांनी देखील मोठं विधान केले आहे. 'आत्ताच भवितव्य आणि भविष्य दिसतंय त्यावरून तसं काही वाटत नाही. राजकारणात काधीही काही घडू शकतं, सकाळचा संध्याकाळी आणि संध्याकाळचा सकाळी कुठे? त्यामुळे राजकारणात काय घडेल सांगू शकत नाही. गुलाबरावांना तशी भनक लागली असेल.', असे भरत गोगावले म्हणाले.

दरम्यान, शिंदेसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबात सूचक विधान केले होते. जिथे आमचे इंजिन जाईल तिथे डबा जाईल, असे गुलाबराव पाटील म्हणाले होते. त्यांनी सांगितले होते की, दोन्ही शिवसेना एकत्र येणार का यावर मी काही सांगू शकत नाही. शेवटी मी आगगाडीचा डब्बा आहे. आमचे नेते एकनाथ शिंदे इंजिन आहेत आणि इंजिन जिथे असतं तिथे डब्बे असतात. त्यामुळे जिकडे इंजिन जाईल तिकडे डब्बा जाईल.', असं विधान त्यांनी केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.