Diwali firecracker accident: फटाके फोडताना अचानक २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू; पोलिसांकडून अधिक तपास सुरु

Firecracker accident Maharashtra: दिवाळीत फटाके फोडताना कोपरगावमध्ये २५ वर्षीय साहिल आव्हाडचा मृत्यू झाला. तर वसई-विरारमध्ये रील बनवण्याच्या नादात दोन तरुण जखमी झाले. फटाके फोडताना कोणती काळजी घ्यावी, अपघात टाळण्यासाठी कोणते नियम पाळावेत, जाणून घ्या.
Diwali firecracker accident
Diwali firecracker accidentsaam tv
Published On: 

दिवाळीत फटाके फोडण्याचा आनंद एका तरुणाच्या कुटुंबासाठी दु:खात बदलला आहे. कोपरगाव तालुक्यातील बेटमध्ये फटाके फोडताना गंभीर दुखापत झाल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. साहिल विलास आव्हाड असं मृत तरुणाचं नाव आहे. ११ नोव्हेंबर रोजी रात्री ही घटना घडली. भाऊबिजेच्या चांगल्या दिवशी घडलेल्या घटनेने हळहळ व्यक्त केली जातेय.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, साहिल रात्री फटाके फोडत होता. त्यावेळी त्याला काहीतरी वस्तू लागल्याने गंभीर दुखापत झाली. या घटनेत त्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्यामुळे त्याला तातडीने उपचारासाठी नाशिकमध्ये हलवण्यात आलं. पण रुग्णालयात उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येतेय.

Diwali firecracker accident
Shiv Sena: मोठी बातमी! उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना एकत्र येणार? दिग्गज नेत्याच्या विधानाने राजकारणात खळबळ

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीये. साहिलच्या मृत्यूचं नेमके कारण काय, हे पोलीस तपासानंतर समोर येणार आहे.

फटाके फोडताना रील बनवण्याच्या नादात 2 जण जखमी

दरम्यान वसई-विरारमध्येही रील बनवण्याच्या नादात फटाके फोडताना दोन तरुण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. २१ वर्षीय विनीत कुमार याने हातात धरून आकाशात उडणारा फटाका पेटवला. पण फटाका हातातच फुटल्याने त्याचा हात भाजला. त्याच्या हातावर प्लास्टिक सर्जरी करून ७२ टाके घालण्यात आले. तर राजावलीमध्ये १८ वर्षीय अंजुम यादव याने हातात सुतळी बॉम्ब फोडण्याचा प्रयत्न केला. या स्फोटात त्याची करंगळी निकामी झाल्याने डॉक्टरांना ती कापावी लागली.

Diwali firecracker accident
Accident News : भाऊबीजेच्या दिवशी काळाचा घाला! एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू

फटाके फोडताना काय काळजी घ्यावी?

  • फटाके नेहमी मोकळ्या जागेत आणि मोठ्यांच्या देखरेखीखाली फोडावेत

  • फटाके हातात धरून पेटवू नयेत

  • फटाका पेटवल्यानंतर त्यापासून सुरक्षित अंतर ठेवावं

  • न फुटलेल्या फटाक्याजवळ पुन्हा जाऊ नये

  • रील किंवा व्हिडिओ बनवण्याच्या नादात स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नये

काही क्षणांच्या आनंदासाठी आयुष्य धोक्यात घालणं टाळा, असं आवाहन करण्यात येत आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.