Accident News : भाऊबीजेच्या दिवशी काळाचा घाला! एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू

Uttar Pradesh Car Accident News Update : भाऊबीजेच्या दिवशी उत्तर प्रदेशातील हरदोई येथे भीषण अपघात झाला. गंगा एक्स्प्रेसवेवर कार डिव्हायडरला धडकल्याने पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला.
Uttar Pradesh Accident News
Uttar Pradesh Accident News AI Image
Published On: 
Summary
  • उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील गंगा एक्स्प्रेसवेवर भाऊबीजेच्या दिवशी भीषण अपघात.

  • नोएडाहून प्रयागराजला जाणाऱ्या उपाध्याय कुटुंबाच्या कारचा डिव्हायडरला जोरदार धक्का.

  • अपघातात शिवम उपाध्याय आणि पत्नी मेनका यांचा जागीच मृत्यू.

  • सात वर्षांचा व्योम आणि पाच वर्षांचा शिवांग यांचाही मृत्यू

देशभरात सर्वत्र काल भाऊ बहिणीचा आवडता सण म्हणजेच भाऊबीज साजरी केली गेली. मात्र एकीकडे आनंदी वातावरण असताना दुसरीकडे उत्तर प्रदेशातील एका कुटुंबावर सणाच्या दिवशी काळाने घाला घातला. उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात गंगा एक्स्प्रेसवेवर भाऊबीजेला निघालेल्या एकाच कुटुंबातील चार जणांचा अपघात झाला. या दुर्घटनेत पती-पत्नीसह त्यांच्या दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेगात असलेली कार डिव्हायडरला धडकल्याने हा अपघात घडला असल्याची माहिती आहे. दरम्यान पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रयागराज येथील शिवम उपाध्याय हे पत्नी मेनका उपाध्याय आणि दोन मुलांसह नोएडा येथून प्रयागराजला जात होते. गंगा एक्स्प्रेसवेवरील सांडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भटौली गावाजवळ त्यांची कार अचानक नियंत्रणाबाहेर गेली. त्यानंतर कार थेट रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरला धडकली. धडक इतकी जोरदार होती की कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला.

Uttar Pradesh Accident News
Brain Health : तुमचा मेंदू हळूहळू कमकुवत होतोय? 'या' ९ सवयी आजच बदला; दुर्लक्ष करणं पडेल महागात

या अपघातात शिवम आणि मेनका यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा सात वर्षांचा मुलगा व्योम गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याने अखेरचा श्वास घेतला. दुसरा पाच वर्षांचा मुलगा शिवांग यालाही गंभीर अवस्थेत हरदोई येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यालाही मृत घोषित केले. त्यामुळे या अपघातात संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला.

Uttar Pradesh Accident News
Rain Alert : धो धो पाऊस कोसळणार! १५ राज्यांना पावसाचा इशारा; ताशी ७० च्या वेगाने वारे वाहणार

घटनेची माहिती मिळताच बिलग्राम, सांडी आणि मल्लावां पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. एक्सप्रेस-वेवरील कर्मचाऱ्यांनीही बचावकार्यात मदत केली. अपघातानंतर कार सुमारे ३० मीटरपर्यंत डिव्हायडरवर घासत गेल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, शिवम हे नोएडा येथे नोकरी करत होते. भाऊबीजेच्या निमित्ताने ते पत्नी आणि मुलांसह प्रयागराजला निघाले होते. मात्र, प्रवासादरम्यान काळाने संपूर्ण कुटुंबावर घाला घातला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.