Shocking : नाशिक हादरलं! इंजिनिअरने राहत्या घरी संपवलं आयुष्य, मृत्यपूर्वी लिहलं पत्र; धक्कादायक कारण समोर

Nashik Engineer Sucide News : नाशिकच्या दातीर नगरमध्ये २८ वर्षीय इंजिनीअर पवन पाटील यांच्या मृत्यूप्रकरणी दोन तरुणींसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल. पोलिसांकडून आरोपांची पडताळणी सुरू.
Nashik Crime News
Nashik Crime News AI Image
Published On: 
Summary
  • नाशिकच्या दातीर नगर परिसरात २८ वर्षीय इंजिनीअर पवन पाटीलची आत्महत्या

  • पवन मूळचा जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील रहिवासी

  • तरुणीच्या जाचाला कंटाळून पवनची आत्महत्या

  • एमआयडीसी पोलिसांनी दोन तरुणींसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला

नाशिक शहरातील दातीर नगर परिसरात एका २८ वर्षीय तरुण इंजिनीअरने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पवन राजेंद्र पाटील असे मृत तरुणाचे नाव असून, तो काही महिन्यांपूर्वी नाशिकमधील एका खासगी कंपनीत नोकरीला लागला होता. या घटनेप्रकरणी पोलिसांनी दोन तरुणींसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पवन हा मूळचा जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील रहिवासी होता. त्याचे वडील राजेंद्र भगवंतराव देसले पाटील हे शिक्षक आहेत. पवनने इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर नाशिकच्या एका नामांकित कंपनीत नोकरीवर रुजू झाला. मात्र, काही दिवसानंतर त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अडचणी आल्या. मिळालेल्या माहितीनुसार, पवनची एका तरुणीशी मैत्री होती. पवन नाशिकला येताच त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. संबंधित तरुणीने त्याचा फोन उचलत नव्हती. तसेच ती त्याच्या संपर्कात येण्याचे टाळायची. यामुळे तो मानसिक तणावाखाली होता, असा आरोप आहे. तसेच, त्याने संबंधित तरुणीला मोठी रक्कम दिली होती, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Nashik Crime News
Morning Headache : सकळी उठल्या उठल्या डोकं दुखतं? असू शकतं 'या' भयंकर आजाराचं संकेत

पवन काही दिवसांसाठी गावी गेला असताना त्याच्या वागण्यात झालेला बदल कुटुंबीयांच्या लक्षात आला. त्याच्याशी चर्चा केल्यानंतर त्याने काही व्यक्तींकडून मारहाण आणि धमक्या मिळाल्याचे सांगितल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. जयदीप पाटील आणि हेमंत जाधव यांच्यासह काही जणांकडून त्रास दिला जात असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. यानंतर पवनने नाशिकमधील दातीर नगर येथील राहत्या घरी आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. यावेळी पोलिसांना त्याने मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी मिळाली. या चिठ्ठीत काही व्यक्तींची नावे आणि त्यांच्याकडून झालेल्या कथित त्रासाचा उल्लेख असल्याचे सांगण्यात येते.

Nashik Crime News
Weather Update : ‘अर्णब’ चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकलं! महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

पवनच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन तरुणी, जयदीप पाटील आणि हेमंत जाधव या चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि धमकावणेसाठी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक लाड या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, चिठ्ठीतील मजकूर आणि तक्रारीतील आरोपांची पडताळणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com