Alisha Khedekar
सकाळी जाग आल्यावर वारंवार डोकेदुखी होत असेल, तर त्यामागील कारण समजून घेणे महत्त्वाचे आहे.
झोप पूर्ण न होणे, अनियमित झोप किंवा स्लीप ॲपनियामुळे सकाळी डोकेदुखी जाणवू शकते.
झोपेत श्वास वारंवार थांबत असल्यास ऑक्सिजनची पातळी प्रभावित होऊ शकते आणि सकाळी डोकेदुखी होऊ शकते.
मायग्रेनमुळे सकाळी डोके दुखू शकते. वेदनांसोबत मळमळ, प्रकाशाचा त्रास किंवा उलट्याही होऊ शकतात.
अत्यंत वाढलेला रक्तदाब गंभीर ठरू शकतो. डोकेदुखीसोबत छातीत दुखणे किंवा दृष्टी बदलल्यास तातडीने मदत घ्या.
रात्री पुरेसे पाणी न प्यायल्याने निर्जलीकरण होऊ शकते. त्यामुळे सकाळी डोकेदुखी आणि थकवा जाणवू शकतो.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा