

मेष - कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसायात नवीन ग्राहक जोडण्याची संधी मिळेल. आर्थिक बाबतीत दिवस समाधानकारक राहू शकतो. जुन्या गुंतवणूकीतून फायदा होण्याची शक्यता आहे.
वृषभ - पैशांच्या व्यवहारात सावध राहा. कोणालाही पैसे उधार देताना विचार करा आणि बचतीवर लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.
मिथुन - आर्थिक व्यवहारांचे योग्य नियोजन करा. अचानक खर्च उद्भवण्याची शक्यता आहे. नवीन करार किंवा ग्राहकांशी चर्चा करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. कामातली कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. नवीन संपर्कांमुळे प्रगतीचे मार्ग खुले होऊ शकतात.
कर्क - घरगुती खर्च वाढण्याची शक्यता आहे. खरेदी करताना गरज आणि बजेट यांचा विचार करा. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात. अपूर्ण कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील.
सिंह - आर्थिक बाबतीत महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य माहिती घ्या. वरिष्ठांसमोर तुमच्या कल्पना मांडता येतील. लगेचच विश्वास ठेवू नका.
कन्या - आर्थिक नियोजनासाठी दिवस महत्त्वाचा ठरेल. जास्तीचा खर्च कमी केल्याने बचत वाढू शकते. नवीन प्रोजेक्ट किंवा कामाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कल्पनांना सकारात्मक प्रतिसाद मिळेल. कामात चुका होणार नाहीत याची काळजी घ्या.
तूळ - घर आणि कुटुंबाशी संबंधित खर्च वाढू शकतो. मोठी खरेदी करण्याआधी आर्थिक परिस्थिती तपासा. काम आणि वैयक्तिक जबाबदाऱ्यांचा समतोल राखावा लागेल. नवीन व्यावसायिक संधींचा विचार करा.
वृश्चिक - आर्थिक नियोजनासाठी दिवस चांगला आहे. रखडलेली देणी आणि आर्थिक व्यवहार मार्गी लावण्याचा प्रयत्न करा. नवीन संपर्कांमधून व्यवसायाच्या संधी मिळू शकतात. तुमच्या प्रयत्नांना सकारात्मक दिशा मिळू शकते.
धनु - बचत आणि भविष्यातील आर्थिक नियोजनावर लक्ष द्या. उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ राखा. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. वरिष्ठांशी संवाद साधताना स्पष्ट भूमिका मांडा.
मकर - आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. बचत वाढवण्यासाठी नवीन पर्यायांचा विचार करा. महत्त्वाची कामं पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्याल.
कुंभ - पैशांच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. जास्तीची खरेदी आणि आर्थिक जोखीम टाळा. नवीन जबाबदारी स्वीकारताना नियोजन करा.
मीन - आर्थिक बाबतीत दीर्घकालीन नियोजन करा. बचत आणि आगामी खर्च यांचा विचार करून निर्णय घ्या. सहकारी आणि मित्रांकडून चांगल्या सूचना मिळतील.
डिस्क्लेमर: ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.