Reel Competition : रील बनवा आणि थेट जिंका ३ लाख रुपये! सरकारच्या 'या' भन्नाट स्पर्धेत लगेच घ्या भाग, जाणून घ्या सोपे नियम

Government Video Contest : बिहार सरकारने श्रावणी मेळा २०२६ आणि कांवड यात्रेच्या प्रचारासाठी रील स्पर्धा जाहीर केली आहे. उत्कृष्ठ व्हिडिओला ३ लाखांचे बक्षीस मिळणार आहे.
Government Reel Competition 2026
Government Reel Competition 2026google
Published On

प्रत्येकाचं सोशल मीडियावर व्हायरल व्हायचं स्वप्न असतं. सध्या करोडोंहून जास्त लोक सोशल मीडियावर रिल्स बनवून प्रसिद्ध होत आहेत. नुसते प्रसिद्ध होत नाहीत तर त्यांना चांगली कामंही मिळतायेत.त्यातच सरकारने कंटेंट क्रिएटर्ससाठी मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे.

श्रावणी मेळा २०२६ आणि कांवड यात्रा यांचा देश- विदेशात प्रचार करण्यासाठी विशेष व्हिडिओ स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट रील किंवा व्हिडिओ तयार करणाऱ्या विजेत्याला तब्बल ३ लाख रुपयांचे रोख बक्षीस दिलं जाईल. तसेच इतर विजेत्यांनाही रोख पारितोषिके आणि आकर्षक भेटवस्तू मिळणार आहेत.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्जदार भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे. तसेच त्याच्या इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुद्धा किमान २५ हजार फॉलोअर्स असायला असावेत. स्पर्धेसाठी सादर केलेला व्हिडिओ स्वतः तयार केलेला असायला हवा आणि तो फक्त श्रावणी मेळा, कांवड यात्रा, धार्मिक परंपरा, भाविकांचा प्रवास, स्थानिक संस्कृती किंवा पर्यटनस्थळांवर आधारित असावा.

Government Reel Competition 2026
Ladki Bahin Yojana: रत्नागिरीतल्या लाडक्या बहि‍णींना मोठा झटका, १ लाख ५ हजार महिलांच्या खात्यात ₹१५०० चा हप्ता येणं बंद

व्हिडिओची लांबी ३० सेकंद ते २ मिनिटांचीच असावी. तो HD Quality मध्ये तयार केलेला असायला हवा. कॉपी केलेला, दिशाभूल करणारा किंवा आक्षेपार्ह मजकूर असलेला व्हिडिओ स्वीकारला जाणार नाही. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून तयार केलेले व्हिडिओ किंवा रील्स स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत.

बक्षिसांमध्ये प्रथम क्रमांकासाठी ३ लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २ लाख रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी १ लाख रुपये दिले जातील. याशिवाय दोन स्पर्धकांना प्रत्येकी ५० हजार रुपये आणि पाच स्पर्धकांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे Consolation Prize आणि भेटवस्तू दिल्या जाणार आहेत.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व्हिडिओ बिहार पर्यटन विभागाने दिलेल्या ऑनलाइन पोर्टलवर अपलोड करावा लागेल. अर्ज प्रक्रिया गूगल फॉर्मद्वारे पूर्ण केली जाईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट २०२६ आहे. त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. बिहार सरकारचा उद्देश सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रावणी मेळा आणि कांवड यात्रेचे धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन महत्त्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे.

Government Reel Competition 2026
Blood Pressure: हाय बीपीचा धोका टाळण्यासाठी शरीराचे हे 'साइलेंट' सिग्नल वेळीच ओळखा, नाहीतर...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com