

रत्नागिरी जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या अनेक महिलांना मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्यातल्या तब्बल १ लाख ५ हजार ५२१ महिलांचे अर्ज अपात्र ठरवल्यामुळे त्यांच्या खात्यात योजनेता हप्ता जमा झालेला नाही. मात्र प्रशासनाने स्पष्ट केलं की, फक्त तांत्रिक कारणांमुळे अपात्र ठरलेल्या महिलांना त्रुटी दुरुस्त करण्याची संधी दिली जात आहे.
महिला व बालविकास विभागाच्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यात या योजनेसाठी ३ लाख ७७ हजार ४७ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी २ लाख ७१ हजार ९५६ महिला पात्र ठरल्या आहेत. त्यांच्या बँक खात्यात योजनेती रक्कम जमा करण्यात आली आहे. उरलेले अर्ज विविध कारणांमुळे अपात्र ठरले.
प्रशासनाने सांगितलं की, अनेक अर्जांमध्ये ई- केवायसी पू्र्ण नसणे, आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नसणे, इतर शासकीय योजनांचा लाभ मिळत असणे, कुटुंबातले सदस्य सरकारी कर्मचारी किंवा आयकरदाता असणे, चारचाकी वाहन असणे, वयोमर्यादा पूर्ण न होणे किंवा अर्जातली माहिती चुकीची असणे अशी कारणे आढळली.
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ज्या महिलांचे अर्ज फक्त तांत्रिक कारणांमुळे अपात्र झाले आहेत. त्यांनी ई-केवायसी पूर्ण करणे, आधार- बँक लिंक करणे आणि आवश्यक कागदपत्रातल्या चुका दुरुस्त करणे गरजेचं आहे. त्रुटी दूर केल्यावर पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळू शकतो.
दरम्यान, काही लाभार्थी महिलांनी सतत केवायसी आणि पडताळणी प्रक्रियेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. रत्नागिरीतल्या लाभार्थी राधिका पांचाळ यांनी शासनाने सतत केवायसीच्या नावाखाली महिलांना त्रास होत असल्याची भावना व्यक्त केली आहे. प्रशासनाने ज्या महिलांचे अर्ज अपात्र आहेत त्यांनी संबंधित विभागाशी तातडीने संपर्क साधून आवश्यक दुरुस्ती करून घ्यावी, असं आवाहन केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.