Success Story: लहानपणी कामाचे १० रुपये मिळायचे, दोन वेळचे जेवण नव्हते, पठ्ठ्याने हार मानली नाही, आधी पोलिस कॉन्स्टेबल ते आता IAS अधिकारी

Success Story of IAS Ram Bhajan Kumbhara: आयएएस राम भजन कुम्हारा यांनी खूप खडतर परिस्थितीत बालपण घालवले. त्यांच्याकडे दोन वेळच्या जेवणासाठीही पैसे नव्हते. त्यांनी खूप मेहनतीने यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

यूपीएससी परीक्षा देऊन प्रशासकीय अधिकारी होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतु यूपीएससी परीक्षा देण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. दिवसरात्र एक करुन अभ्यास करावा लागतो. अनेकांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळत नाही. परंतु जो व्यक्ती सतत प्रयत्न करतो त्याला नक्कीच यश मिळते. असंच यश आयएएस राम भजन कुम्हारा यांना मिळाला. (Success Story)

Success Story
Success Story: इन्कम टॅक्समधील नोकरी धुडकावली,संसार अन् नोकरी सांभाळत UPSC केली क्रॅक; IPS तनुश्री यांचा प्रेरणादायी प्रवास

राम भजन कुम्हारा यांचे बालपण खूप खडतर परिस्थिती गेले. त्यांच्याकडे दोन वेळच्या जेवणाचेही पैसे नव्हते. परंतु तरीही त्यांनी प्रयत्न सुरु ठेवले. त्यांनी आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी यूपीएससी परीक्षा दिली आणि क्लिअर केली.

राम भजन कुम्हारा हे मूळचे राजस्थानचे रहिवासी. त्यांच्याकडे राहण्यासाठी घर नव्हते. एवढे सर्व असतानाही राम भजन यांनी शिक्षण घेतले. त्यांनी यूपीएससी परीक्षेत ६६७ रँक मिळवली.

राम भजन यांनी आपल्या आईसोबत काम केले आहे. ते आईसोबत दगड फोडण्याच्या कामासाठी जायचे.त्यांना यासाठी दिवसाला ५-१० रुपये मिळायचे. तर त्यांचे वडील आइस्क्रिम विकायचे काम करायचे. ते पाचवी-सहावीत असताना रोज काम करायचे.

१९९८ मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले. तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही. आपले शिक्षण पूर्ण करण्याचे ठरवले. त्यांनी सरकारी कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. २००९ मध्ये त्यांना दिल्ली पोलिसमध्ये हेड कॉन्स्टेबलची नोकरी मिळाली. (Success Story of Ram Bhajan Kumbhara)

Success Story
Success Story: सरकारी शाळेतून शिक्षण; स्पर्धा परीक्षेत दोनदा अपयश, तिसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IPS अंकिता शर्मा यांचा प्रवास

राम भजन कुमार यांनी २०१५ मध्ये यूपीएससी (UPSC) परीक्षेची तयारी केली. परंतु त्यांना अनेकदा अपयश आले. परंतु त्यांनी प्रयत्न सोडले नाही. दरवर्षी परीक्षा दिली. अखेर २०२२ मध्ये त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि ते आयएएस झाले.

राम भजन कुम्हारा यांच्याकडे शाळेत जाण्यासाठी कपडे नव्हते. शाळेत जाताना त्यांचे कपडे फाटलेले असायचे. अनेक ठिकाणी कपड्यांना टाके मारलेले होते. त्यांच्या घरात दोन वेळचे जेवण मिळत नव्हते. तरीही त्यांना या परिस्थितीतून मार्ग काढला आणि यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.

Success Story
Success Story: परदेशातील १ कोटी रुपये पगाराला मारली लाथ, UPSC चा घेतला ध्यास; पहिल्या प्रयत्नात मिळवली नंबर १ ची रँक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com