Success Story: परदेशातील १ कोटी रुपये पगाराला मारली लाथ, UPSC चा घेतला ध्यास; पहिल्या प्रयत्नात मिळवली नंबर १ ची रँक

Success Story Of IAS Kanishk Kataria: आयएएस कनिष्क कटारिया यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांनी २०१८ मध्ये पहिली रँक मिळवली आहे.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

प्रत्येकाची काही न काही स्वप्ने असतात. आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण खूप प्रयत्न करतो. अनेकांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळते तर अनेकांना वाट पाहावी लागते. आयएएस कनिष्क कटारिया यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांनी २०१८ च्या यूपीएससी परीक्षेत पहिली रँक मिळवली आहे.

कनिष्क कटारिया हे बंगळुरुत डेटा सायंटिस्टची नोकरी करायची. त्यांनी २०१८ मध्ये यूपीएससी परीक्षेत चांगले यश मिळवले. कनिष्क यांनी IIT बॉम्बेमधून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर देशातील सर्वात अवघड परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले.

Success Story
Success story: कोशिश करने वालों की...! देविदास पाटलांची यशोगाथा वाचून तुम्ही कधीच हार मानणार नाही!

आयएएस कनिष्ठ कटारिया यांनी जेव्हा यूपीएससी (UPSC) परीक्षा देण्याचा निर्णय घेतला तेव्हा ते परदेशात १ कोटी रुपये पगाराची नोकरी करत होते. परंतु त्यांनी देशासाठी काहीतरी करायचे म्हणून स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

कनिष्क कटारिया हे जयपूरचे रहिवासी. त्यांचे वडील आणि काका हेदेखील सिविल सर्व्हिसमध्ये होते. वडीलदेखील आयएएस ऑफिसर होते.त्यांना पहिल्यापासूनच प्रशासकीय सेवेत काम करायचे होते.

शिक्षण (Education)

कनिष्क यांनी कोटा येथील सेंट पॉल सीनियर सेकंडरी स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले. २०१० मध्ये IIT JEE मध्ये ४४ रँक मिळवली. त्यानंतर आयआयटी बॉम्बेमधून कॉमप्युटर सायन्स अँड इंजिनियरिंगमध्ये बीटेक केले. त्यानंतर २०१४ मध्ये इंजिनियरिंगची पदवी मिळवली.

२०१६ मध्ये कनिष्क कटारिया यांनी दक्षिण कोरियात सँमसंग कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम केले. त्यांना १ कोटी रुपयांचे वेतन मिळत होते. परंतु ते त्या कामात समाधानी नव्हते. त्यांना देशासाठी काहीतरी करायचे होते.

Success Story
Success Story: सरकारी शाळेतून शिक्षण; स्पर्धा परीक्षेत दोनदा अपयश, तिसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IPS अंकिता शर्मा यांचा प्रवास

IAS बनण्याचा प्रवास

चांगल्या पगाराची नोकरी असतानाही कनिष्क हे परत भारतात परतले. त्यांनी बंगळुरुमध्ये डेटा सायंटिस्ट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी दिल्लीत ७-८ महिने कोचिंग घेतले. त्यानंतर २०१८ मध्ये स्वतः सेल्फ स्टडी करत होते. त्यांनी दिवसाला १३-१४ तास अभ्यास केला. त्यामुळेच त्यांना हे यश मिळाले.

Success Story
Success Story: जिद्द! दिवसा नोकरी, रात्री अभ्यास; कोचिंग क्लासेसशिवाय UPSC क्रॅक केली, IAS श्वेता भारती यांचा प्रेरणादायी प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com