Success story: कोशिश करने वालों की...! देविदास पाटलांची यशोगाथा वाचून तुम्ही कधीच हार मानणार नाही!

देविदास पाटील पोलिओग्रस्त आहेत. लहानपणी ताप आल्याचे निमित्त झाले. पुढे डॉक्टरांनी पोलिओ असल्याचं सांगितलं. आजी आजोबा बांबू विकुन, शेतातली कामे करुन चार पैसे कमावून उदरनिर्वाह करायचे. काका ढोलताशा वाजवून चार पैसे कमवायचे. वडील शेतकरी आई घरकाम करायची, असा एकत्र राहणारा परिसर! पोलिओ झाल्याचे समजताच त्यावेळी, आई-वडिलांनी खूप प्रयत्न केले.
Success story
Success storysaam tv
Published On

कयाक म्हणजे एक छोटी अरुंद होडी आणि ती चालवणाऱ्या कयाकर म्हणतात. कयाक एक साहसी खेळाचा प्रकार आहे. या खेळात महाराष्ट्रातील एकमेव पॅरा ऑलिम्पिक राष्ट्रीय खेळाडू, रायगड भूषण, देविदास पाटील यांची ही यशोगाथा !

देविदास पाटील पोलिओग्रस्त आहेत. लहानपणी ताप आल्याचे निमित्त झाले. पुढे डॉक्टरांनी पोलिओ असल्याचं सांगितलं. आजी आजोबा बांबू विकुन, शेतातली कामे करुन चार पैसे कमावून उदरनिर्वाह करायचे. काका ढोलताशा वाजवून चार पैसे कमवायचे. वडील शेतकरी आई घरकाम करायची, असा एकत्र राहणारा परिसर! पोलिओ झाल्याचे समजताच त्यावेळी, आई-वडिलांनी खूप प्रयत्न केले. देव, उपासतापास, डॉक्टर, वगैरे वगैरे, पण यश आलं नाही. एका पायाला अपंगत्व आहे. लहानपणी कुणी खेळायला घेत नव्हतं, मित्र नाही अगदी एकट्याने गुपचुप बसून राहणाऱ्या देविदासना शाळेत घातलं. चालता येत नव्हते. भाई कडेवर घेऊन शाळेत जायची, शाळा संपेपर्यंत वर्गाच्या बाहेर बसून राहायची.

शाळेत सतत रडणाऱ्या आपल्या मुलासाठी आई तिथेच थांबायची. शाळेत मुळं खेळायला घेत नव्हती, चेष्टा करायची, चिडवायची मग घरी येऊन देविदास उदास बसायचा. त्यामुळे अभ्यासान अजिबात लक्ष लागत नव्हतं. तिसरी इयत्तेत दोनवेळा नापास झालेल्या देविदासला हळूहळू अभ्यासाची गोडी लागली.

Success story
Success Story: 17 व्या वर्षी लग्न, 300 रूपयांपासून घरीच केली बिझनेसला सुरुवात, आज उभारली ₹7,000 कोटींची कंपनी

काळ भराभर पुढे सरकत होता. पाहता पाहता शालेय शिक्षण संपवून देविदासने सेफ्टी फायर डिप्लोमा हा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. आपण काहीतरी कुठे पाहिजे हा विचार त्याला स्वस्थ बसु देत नव्हता. प्रयत्नांनी परमेश्वर - या उक्तीप्रमाणे त्याला एका कंपनीत सेफ्टी ऑफीसर या पदावर नोकरी मिळाली. काही ठिकाणी दिव्यांग आहे म्हणून नोकरी मिळाली नव्हती. त्यामुळे ही नोकरी मिळाल्‌यावर आणि पहिला पगार आई बाबांच्या हाती ठेवताना रेविदासला खूप आनंद झाला. कंपनीमधे चांगले मित्र मिळाले. त्यांनी दिव्यांगांसाठी खेळ, खेळातूनच सरकारी नोकरी मिळू शकते असा आशावाद निर्माण केला.

देविदासचा लहान भाऊ भास्कर व्यायाम शाळेत जात असे त्याच्या बरोबर एकदा देविरास पण व्यायाम शाळेत गेला. सुरूवातीला शांत बसून पाहत राहयचं. पण नंतर त्यांना अंतः प्रेरणेने व्यायाम करावा वाटू लागलं. आहमविश्वास वाढला, शरीर बदलू लागलं. मनात उत्साह वाढू लागला.

Success story
कर्तृत्वाला सलाम,'विशेष'ची अविश्वसनीय गगनभरारी; यशोगाथा वाचून डोळ्यांत टचकन पाणी येईल

दरम्यान दिव्यांगांसाठी विविध स्पर्धा होतात, असं समजल्यावर त्याबाबत देविदासनी माहिती गोळा करायला सुरूवात केली. २०१५ ला मनोज नावाच्या त्यांच्या मित्राच्या सांगण्यावरून त्यांनी दिव्यांगांसाठी असलेल्या पावर लिफ्टींग मध्ये भाग घेतला आणि ते जिंकले. यानंतर त्यांची यशस्वी घोडदौड सुरु झाली. घरी TV वर पॅराऑलिम्पिक पाहत असताना, देविदास आई वडिलांना म्हणायचे, मला असं खेळाडू बनायचंय. त्यांनी एक डायरी घेतली, पॅराऑलिम्पिकच्या सर्व खेळांची नावं शोधून काढली. स्वतःसाठी त्यातले कोणते योग्य, यावर भरपूर विचार आणि अभ्यासही केला. मग लक्षात आलं जॉवलिन फेकायला आपल्याला रनिंग येत नाही, गोळा फेकायला एका पायावर फिरता येत नाही, शूटींग-आर्चरी हे खेळ परवडणर नाहीत.

मग गुगलवरुन Water Sports बदल माहिती गोळा केली. तिथेच एक नंबर मिळाला, सहज कॉल केला. भावना मॅडम कायकिंग कनाई सेक्रेटरी याच फोनवर होत्या. त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. मॅडमनी उत्तम मार्गदर्शन केलं. मध्यप्रदेशात भोपाळ येथील मयांक गहूर सरांशी संपर्क करायला सांगितलं. सरांनी भोपाळला बोलवतं. यावेळी इतक्या दूर म्हणून घरचे नकार देऊ लागले. शिवाय खिशात पैसे नाहीत. पण मनात जिगर आणि आत्मविश्वास होता. त्या बळावर सरांपर्यंत पोहचल्यावर देविदास आनंदी झाले. जान्हागिराबाद येथील तलावासमोर एका छोट्याश्या खोलीत राहून तलावातले मासे पकडून खाऊन प्रशिक्षण सुरु झाले. मेलो तरीही चालेल पण Swimming शिकलंच पाहिजे, म्हणून प्रथम पोहायला शिकले. आणि मग खरी सुरवात झाली. कायकिंग कनाईची!

Success story
Success story: दिव्यांग असूनही नताशा जोशीने जग जिंकलं; प्रेरणादायी कहाणी वाचून थक्क व्हाल

यावेळी त्यांनी प्रत्येक क्षण सत्कारणी लावला, चार वर्ष भोपाळला राहून सराव केला आणि सुरू झाल्या स्पर्धा.... २०१८, ते २०२१ राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. उजबेकिस्तान, २ वेळा पोलंड, पुणे येथे आशियाई चॅम्पियनाशिप मध्येगोल्ड मेडल मिळवलं. यावेळी त्याा क्रीडारत्न २०२४ पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट जिल्हा क्रीडा गुणवंत पुरस्कार २०२१ ला मिळाला.

महाराष्ट्र शासनाने २०१८ ते २०२४ या काळातील बोटींग कायकिंग कारकीर्दीची दखल घेतली आणि राज्य शासनाने थेट नियुक्ती, सरक भरती द्वारे, सहाय्यक क्रीडा विकास अधिकारी या पदावर बालेवाडी-पुणे इथे नियुक्ती केली. आंतरराष्ट्रीय पॅरा खेळाडू बनण्याचं आपले स्वप्न मोठ्या जिद्दीने पूर्ण करणाऱ्या देविदास पाटील व त्यांच्या आई-वडिळांचे मनःपूर्वक कौतुक व अभिनंदन

नूतन गुळगुळे फाऊंडेशन ही दिव्यांगासाठी कार्यरत आहे. या फाऊंडेशनविषयी तुम्हाला माहिती हवी असल्यास तुम्हीही जोडले जाऊ शकता. संकेतस्थळ- https://www.nutanfoundation.org/

संपर्क- 9920383006

इमेल आयडी- nutangulgulefoundation@gmail.com

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com