कर्तृत्वाला सलाम,'विशेष'ची अविश्वसनीय गगनभरारी; यशोगाथा वाचून डोळ्यांत टचकन पाणी येईल

Success story: लढायचं आणि आपल्या तान्हुल्याला मोठं करायचं. पारंपारिक पद्धतीने बाळाच्या जन्मानंतरच्या कौटुंबिक कुळाचाऱ्याच्या सर्व गोष्टी लवकरात लवकर आवरून बाळाचे नाव विशेष ठेऊन सगळे मुंबईत आले.
Success story
Success storysaam tv
Published On

I may not be the best, but I am special...! असं म्हणणाऱ्या विशेष जोशी याच्या जीवनाची आणि त्यांच्या आईवडिलांच्या समर्पणाची ही कहाणी आहे. लव्हलिना आणि वडील संजी जोशी यांच्या पोटी जन्म घेतलेल्या विशेशचे कौतुक करावे तितके कमीच आहे. राजस्थानमधील कोटा गावी त्याचा जन्म झाला. घरात आनंदी आनंद साजरा होत असताना डॉक्टरांनी बाळाला डाऊन सिंड्रोम आहे, असं सांगितलं. यामुळे शारीरिक मानसिक वाढ होऊ शकत नाही, असं ऐकल्यावर आईच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. दुःखाचा आवेग ओसरल्यावर मात्र त्याच्या आई-वडिलांनी निश्चय केला, आता रडायचं नाही. लढायचं आणि आपल्या तान्हुल्याला मोठं करायचं. पारंपारिक पद्धतीने बाळाच्या जन्मानंतरच्या कौटुंबिक कुळाचाऱ्याच्या सर्व गोष्टी लवकरात लवकर आवरून बाळाचे नाव विशेष ठेऊन सगळे मुंबईत आले. विशेषला वाढवायचे, घडवायचे मोठे करायचे हा ध्यास मनात घेऊन, सुरु झाली एक यशस्वी धडपड.

Success story
Success Story: 17 व्या वर्षी लग्न, 300 रूपयांपासून घरीच केली बिझनेसला सुरुवात, आज उभारली ₹7,000 कोटींची कंपनी

डाऊन सिंड्रोम हा शब्दही माहिती नसलेल्या विशेषच्या आई-वडिलांनी त्याबद्दलची सर्व माहिती वाचली. त्यावर विचारआणि चिंतनही केले. अनेक पुस्तके, संशोधन पत्रिका वाचवल्यावर त्यांनी ठरवलं की, अवघड आहे पण अशक्य नाही. आता पुन्हा डोळ्यात पाणी नाही आणायचं, विशेषच्या प्रत्येक गोष्टीत विशेष लक्ष घालायाचं. सुरुवातीला त्याला नॉर्मल मुलांच्या शाळेत घातलं. त्याचबरोबर त्याची मानसिक आणि शारीरिक वाढ नीट होण्यासाठी विविध उपचार (थेरेपी) सुरु केल्या. वयाच्या सहाव्या वर्षी माहिमच्या कॅनोसा स्पेशल शाळेत प्रवेश घेतला. कुटुंबातील वातावरण विशेषच्या वाढीसाठी पोषक-पूरक असणे गरजेचे आहे, असे लक्षात घेऊन त्याच्या आईने मानशास्त्राचा अभ्यासही केला. ग्लायडर फ्लाईट चालवणाऱ्या त्याच्या आईला गगन भरारीचे वेड होते. तशीच भरारी आपल्या मुलाने घ्यावी यासाठी त्याचे पंख बनली.

Success story
Success Story: एका ड्रिंकनं डोकं झणाणलं; देसी ड्रिंकला ब्रँड बनवून ३ भाऊ झाले कोट्यवधींच्या कंपनीचे मालक

आईची इच्छाशक्ती विशेषचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर मानसिकदृष्ट्या विकलांग मुलांसाठी असलेल्या अभिलाषा सेंटरमध्ये तो शिकला. यादरम्यान आवश्यक ते शारिरीक व्यायाम, हालचाली, गाणी ऐकणे, स्त्रोत्र ऐकणं, गायत्रीमंत्र ऐकणे, श्वासांचे प्रकार अवगत करणे अशा सर्व गोष्टी आई-बाबा नित्यनियमाने करवून घेत होते. विशेषला मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षणही सुरु होते. विशेषने मार्शल आर्ट्समधील ८ लेवल्स पूर्ण करून रेड बेल्ट मिळवला आहे. हळूहळू तो पारंगत झाला. प्रयत्नांना यशाची जोड मिळाली. मुंबईमध्ये पार पडलेल्या २०१५ च्या मार्शल आर्ट्सच्या राष्ट्रीय स्पर्धेत नॉर्मल गटात त्याला गोल्ड मेडल मिळालं. त्याच्या या यशाने सारेच थक्क झाले. त्यानंतर स्पेशल ऑलिम्पिक्स २०१६ मध्ये सहभाग घेतला. विशेषला नृत्याची, अभिनयाची आवड आहे. त्याच्या या कलागुणांना आई-बाबा आणि आऊ कार्तिनेय यांनी जपले आणि वाढवले.

Success story
Success Story: १५०० रूपयांच्या बिझनेसला ३ कोटींपर्यंत पोहोचवलं, जाणून घेऊया संगीता यांची यशोगाथा

कुटुंबिय आणि नातेवाईकांनी विषेशला कधीही त्यांच्यातील न्यूनत्वाची जाणीव घेऊ दिली नाही. त्यामुळेच विशेषची वाटचाल आनंददायी होत होती. आता विशेषने विसावं वर्ष पूर्ण केलं. म्हणून एक पाऊल पुढे....स्वावलंबन, अर्थार्जनाच्या दिशेने! विषेशने जे FY स्कुल ऑफ स्केल्समधून प्रशिक्षण पूर्ण केले. तिथे बागकाम, कार वॉश, हॉस्पिटॅलिटी याबाबत उत्तम ज्ञान मिळाले. हा कोर्स पूर्ण होताच त्याला पिझ्झा हटमध्ये नोकरी मिळाली. २०१८ पासून तो तिथेच काम करतोय. स्वकष्टाची कमाई करणाऱ्या विषेषच्या प्रामामिक कामाची दखल घेतली गेली. त्याला Outstanding intellectally disabled employee म्हणून सन्मानित करण्यात आले.

विशेषने Red swastik या चित्रपटात काम केलंय. सध्या सितारे जमिन पर आणि हमतुम-कमतुब या दोन चित्रपटात तो काम करतोय. 'वो खुला आसमा' या नाटकातंही त्याने काम केलं आहे. वेगवेळगळ्या फॅशन शोमध्ये तो सेलिब्रिटीसोबत दिमाखाने सहभाग घेत असतो. महाराष्ट्र सुपर मॉडल २०२४ मध्ये मॉडेल MR. Maharashtra super model confidance म्हणून तो विजयी झाला आहे. तेही नॉर्मल विभागात!

Success story
Success Story: नारळानं बदललं आयुष्य; नोकरी सोडली, स्वतःचा बिझनेस थाटला, महिन्याला कमावते ₹20 लाख

अत्यंत सकारात्मक विचाराने विषेषला खऱ्या अर्थाने विशेष घडवणाऱ्या त्याच्या आई-वडिलांना आपल्या मुलाचा सार्थ अभिामान आहे. विषेशच्या आजारपणाबद्दल समजलं तेव्हा एकदाच मी रडले....त्यानंतर आजपर्यंत पुन्हा रडले नाही. डोळ्यात पाणी आलेच तर ते आनंदाश्रू....विषेशच्या कौतुकासाठी सन्मानासाठी आणि यशस्वी आयु्ष्यासाठी....असे म्हणणारी त्याची आई तिच्या पाठी खंबीरपणे उभे असणारे त्याचे बाबा, भाऊ कार्तिनेय आणि विशेष...या वत्सल कुटुंबाचे मनःपूर्वक कौतुक!!!!

शब्दांकन- नीता माळी

नूतन गुळगुळे फाऊंडेशन ही दिव्यांगासाठी कार्यरत आहे. या फाऊंडेशनविषयी तुम्हाला माहिती हवी असल्यास तुम्हीही जोडले जाऊ शकता. संकेतस्थळ- https://www.nutanfoundation.org/

संपर्क- 9920383006

इमेल आयडी- nutangulgulefoundation@gmail.com

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com